चीलापीचे दर घसरल्याने मच्छीमारांवर मोठं संकट

पुणे | सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे चीलापीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे मच्छीमारी अडचणीत आले आहेत. ग्राहकांनी मच्छी खाण्याकडे सध्या पाठ फिरवली आहे. त्यामुळे मच्छी व्यावसायिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात कोरोना महामारी आली होती. त्यामुळे राज्यातील सर्व व्यवसाय, हॉटेल्स बंद करण्यात आले होते. आणि यायाच सर्वाधिक फटका हा मच्छी व्यावसायिकांना बसला आहे. कारण हॉटेल्स बंद असल्यामुळे मच्छी विक्री थांबली होती.
तसेच बाजारपेठेत देखील मच्छी विकत नव्हती, आणि यामुळे त्यावेळी व्यावसायिक अडचणीत आले होते. सध्या देखील त्यांच्यावर अशाच प्रकारची वेळ आली आहे. 120 रुपये किलोच्या आसपास जाणारी मच्छी ही सध्या 60 ते 70 रुपये किलोने जात आहे.
त्यामुळे मोठा तोटा मच्छी व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. राज्यातील काही भागात मात्र मच्छीच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र काही भागात मच्छी च्या दरात मोठी घसरण झाली आहे.