धक्कादायक! टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या मृत्यू खरं कारण आले समोर

पालघर | शापुरजी पालनजी समूहाचे वारसदार आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे एका भीषण अपघातात निधन झाले आहे. आपल्या चार चाकी गाडीने जात असताना पालघर मधील चारोटी परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालक बचावला असून तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याला उच्चारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच सायरस यांना देखील टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचे निधन झाले. आता त्यांचे शव गुजरात येथील त्यांच्या राहत्या घरी पाठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. गाडीवरील कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुपारच्या सुमाराचा हा भीषण अपघात झाला.
अपघातात कार डिव्हायडरच्या पलीकडे गेली. मर्सडीज या गाडीने सायरस प्रवास करत होते. 2012 ते 2016 या कालावधीत ते टाटा समूहाचे अध्यक्ष राहिले होते. त्यांनी लंडन मधूनच त्यांचे शिक्षण पूर्ण केले होते. लंडनच्या बिजनेस स्कूल मधून त्यांनी व्यवस्थापनाचे धडे घेतले. त्यानंतर इंटिरियर महाविद्यालयातून त्यांनी इंजीनियरिंगची पदवी संपादन केली. टाटा समूहामध्ये कार्यरत असताना बऱ्याचदाते वादाच्या विळख्यात अडकले होते. त्यांना सुरुवातीपासून पारदर्शक कामाची सवय होती. मात्र टाटा समूहात त्यांना असे दिसले नाही. यामुळे त्यांनी अनेकदा स्वतःच्याच कंपनीवर आरोप केले होते.
टाटा समूहाची ख्याती संपूर्ण जगभर पसरलेली आहे. मात्र साल 2019 मध्ये तब्बल 13 हजार कोटींचे नुकसान झाले होते असे त्यांचे म्हणणे होते. टाटा समूहाने ही लपवलेली माहिती सायरस यांनी बाहेर काढली होती. सायरस यांनी हा सर्व प्रकार बाहेर काढल्याने टाटा समूहाने 2016 मध्ये त्यांना नोकरीवरून बडतर्फ केले. या सर्वा बाबत सायरस यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र या सर्वांचा काहीच फायदा झाला नाही.
शापूरजी पालोनजी समूहाची टाटा सन्समध्ये भागीदारी होती. यात त्यांची 18.37 टक्के भागीदारी होती. 2012 मध्ये त्यांना टाटा सन्सचे अध्यक्ष बनवले गेले. मात्र त्यांचा कार्य काळ फार कमी वर्षे चालला. यावेळी टाटा समूहाने टाटा सन्स बरोबर भागीदारी घेण्याचे ठरवले होते. मात्र याच कारणांवरून त्यांचे वाद झाले. यात मिस्त्री यांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली. मात्र निकाल टाटा यांच्या बाजूने लागला होता. सायरस यांच्या अपघाती निधनावर अनेक व्यक्ती वेगवेगळे कयास लावत आहेत. लवकरच त्यांचे पार्थिव गुजरातमध्ये दाखल होणार आहे.