लग्नानंतर चार महिन्यातच विवाहितेचा खून, मुलीचा मृतदेहावर माहेरच्यांनी घरी आणून केला अंत्यसंस्कार.

करमाळा : करमाळा येथील कोमल सुभाष यादव हिचा चार महिन्यापूर्वी नेवरे तालुका माळशिरस येथील गणेश पांडुरंग गायकवाड याच्याशी थाटामाटात २० ऑगस्ट 2022 रोजी विवाह नेवर येथेझाला होता
मयत कोमल ची आई राणी सुभाष यादव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की लग्नानंतर कोमल गणेश गायकवाड झालेल्या नवविवाहितेला सासू मनीषा व सासरा पांडुरंग गायकवाड व नवरा गणेश तिघे मिळून मानसिक त्रास देत होते तुला चुलीवरचा स्वयंपाक येत नाही तु लवकर उठत नाही असे सांगून त्रास देत होते
तुझ्यापेक्षा मला सुंदर मुलगी मिळाली असती असे म्हणत नवरा गणेश मानसिक व शारीरिक त्रास देत होता
माहेरच्या लोकांना फोन करू देत नव्हता त्याच्या आता मला पंधरा हजार रुपये माहेरुन आणून दे म्हणून 18 डिसेंबर 2022 रोजी कोमलला सासू सासरा व नवरा गणेश यांनी बेदम मारहाण करून तिच्या बरगड्या तोडून नरडे दाबून तिचा खून केला व खून उघडकीला येऊ नये म्हणून तिने फास घेतला असा बनाव केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी कोमलच्या माहेरकडील यादव कुटुंबांना आपली मुलगी सिरीयस आहे न्यायला या असे म्हणून फोन केला यावेळी यादव कुटुंबातले सदस्य अकलूज येथे गेले असता तिचे मयत होऊन पोस्टमार्टम सुरू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या यादव कुटुंबाने मृतदेह आम्ही आमच्या घरी जाऊन तिच्यावर अंत्यसंस्कार करणारा असे स्पष्ट बजावून मृतदेह करमाळा येथे आणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लग्नानंतर केवळ चार महिन्यात कोमलचा निर्गुण खून सासू-सासरे व नवरा यांनी केला असून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मयत विवाहितेची आई सुभाष यादव यांनी केली आहे. कोमल यादव मुलीचे बारावीपर्यंत शिक्षण झालेली असून अत्यंत गरीब कुटुंबातील ही मुलगी असून नेवरे भागातील चांगला बागायतदार शेतकरी नवरा मिळाला म्हणून संपूर्ण यादव कुटुंब खुश होते पण चारच महिन्यात आपल्या पुढच्या गोळ्याचा निर्गुण खून पाहण्याची दुर्दैवी वेळ यादव कुटुंबावर आली आहे.
या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात नवरा गणेश पांडुरंग गायकवाड सासू मनीषा पांडुरंग गायकवाड सासरा पांडुरंग रामचंद्र गायकवाड यांच्यावर भादवी 302 /304/34/ 304 /बी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. फोन करणे व आई त्याला त्रास देणे व पुरावा नष्ट करणे श्रेयाचागुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या तीन आरोपींना तात्काळ अटक केली आहे