विशेष

डीजेचे साहित्य आणायला गेले असता गाईला वाचवताना चौघांना आले मरण….

चंद्रपूर | रस्त्यावर गाडी चालवत असताना एक मोठी दुर्घटना घडली. यावेळी गाडी समोर गाय आल्याने तिला वाचवण्यात मोठा अपघात झाला आहे. घटनेत जागीच चौघांचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

गडचिरोली येथील पंकज बागडे हे आपली बलेरो गडी घेऊन घरून निघाले. त्यानंतर सावली तालुक्यातील विहिरगाव येथे ते आले. इथे आल्यावर ते आपल्या अनूप ताडूलवार या मित्राला भेटले. त्यानंतर हे दोघे मित्र आपल्या गाडीतून डीजेचे साहित्य आणण्यासाठी निघाले. यावेळी किसानगर येथे एक गाय बसलेली होती. या गायीला पाहून तिला वाचवण्यासाठी त्यांनी स्टिअरिंग फिरवले.

 

यावेळी स्टिअरिंग फिरवले तेव्हा राळ तुटून हातात आला. यावेळी ही गाडी एका ट्रकला धडकली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. सदर घानेचा सावली पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

यावेळी सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तेथील स्थानिक व्यक्तींच्या मदतीने गाडीतील व्यक्तींना बाहेर काढले गेले. तसेच सर्वांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. यामध्ये पंकज किशोर बागडे ( २६) रा. गडचिरोली, अजय तीर्थगिरीवार (२९) रा.ताडगाव, अनुप रमेश ताडूलवार ( ३५ ) रा. विहीरगाव,
महेश्ववरी अनुप ताडूलवार ( २४ ) रा. विहीरगाव या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

 

तर या घटनेत सुरेंद्र हरेंद्र मसराम ( २३ ) रा. चिखली या युवकावर उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरणात पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close