Free Cycal Yojana: मुलींना मिळणारं मोडत सायकल; लगेच करा अर्ज
Free Cycal Yojana in Maharashtra

Free cycal Yojna | नमस्कार! मित्रांनो आज आपण मोफत सायकल योजनेची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो मानव विकास या कार्यक्रम अंतर्गत शासन वेगवेगळ्या योजना राबवत असते. याच योजनेच्या माध्यमातून मुलींना मोफत सायकल वाटप केली जाते. शासनाकडून गरजू मुलींच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील मुलींना सायकल घेण्यासाठी 5000 रुपये अनुदान दिले जात आहे. (Mofat Cycal yojana Maharashtra)
2011 साली या योजनेसाठी शासकीय निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून 23 जिल्ह्यातील 125 तालुक्यामध्ये मुलींना मोफत सायकल देण्याचा निर्णय झाला. यामधे ज्या गरीब कुटुंबातील शाळकरी मुली असतील त्यांना सायकल देण्यात येणार आहे. मुलीच्या घरापासून शाळा ही 5 किलोमीटर वरील अंतरावर असावी लागते. तेव्हाच लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात थेट 5000रू जमा केले जातात. (Free Cycal anudan yojana)
अनुदान वाटपबाबत ची पद्धत – सुरुवातीस पहिल्या वेळेस मुलीच्या अकाउंट वर 3500 रुपये जमा केले जातात. नंतर ज्यावेळी सायकल घेतली जाते त्यावेळी सायकल खरेदी केल्याची पावती आणि आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागतात. कागपत्रांची पडताळणी झाल्यानंतर 1500रू मुलीच्या अकाउंट वर जमा केले जातात. (Cycle yojana)
या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे –
-
- मुलीचे बोनाफाईड
- मुलीचे आधार
- बँक पासबुक
- उत्पंनाचा दाखला
अर्ज कोठे आणि कसा करावा –
- अर्ज हा ऑनलाइन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे करता येतो.
- जर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने करणार असाल तर नेट कॅफे मधून करू शकतात. आणि ऑफलाईन पद्धतीने करणार असाल तर जवळच्या पंचायत समिती मध्ये अर्ज करावा.