इतर

सुसाईड नोट लिहून २० वर्षीय तरुणीची हॉस्टेल मध्येच आत्महत्या; कारण जाणून धक्काच बसेल

औरंगाबाद | अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, भगवान के घर देर है अंधेर नाही, जीवन हे खूप सुंदर आहे, फक्त ते जगले पाहिजे… असे अनेक स्लोगन आजवर तुम्ही ऐकले असतील. मात्र आपल्या जीवनात जेव्हा खरोखर अपयश आणि नैराश्य येते त्यावेळी अनेकांना जीवन संपवणे हाच सोपा मार्ग वाटतो. अशात एखादी साधी व्यक्ती आत्महत्या करते त्यावेळी खूप मोठा धक्का बसतो.

 

औरंगाबाद येथे २० वर्षांची एक मुलगी होस्टेलमध्ये राहत होती. नैराश्यामध्ये येऊन तिने आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. तिने आपल्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय घेत आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे ती खूप साधी आणि सरळ मुलगी होती. कधीच कुणाबरोबर जास्त बोलायची नाही. ती भली आणि तिचा अभ्यास भला असा तिचा स्वभाव होता. मात्र ती आपल्या आयुष्याला कंटाळली आहे याची कुणाला काहीच कल्पना नव्हती.

 

नैराश्यात येऊन तिने होस्टेलमध्ये शॉलच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण औरंगाबाद शहर हादरून गेलं आहे. औरंगाबाद येथील देवगिरी शहरात असलेल्या हॉस्टेलमध्ये २० वर्षीय आरती सर्जेराव कोल्हे ही मुलगी राहत होती.

 

तिचा मूळ घराचा पत्ता गुरु पिंपरी, तालुका घनसांगवी, जिल्हा जालना असा आहे. शिक्षणासाठी ती औरंगाबाद येथील हॉस्टेलमध्ये राहत होती. हॉस्टेलमधील इतर मुलींबरोबर तिचे आयुष्य खूप छान पद्धतीने सुरू होते. मात्र आरती एका वेगळ्या विवंचनेत अडकली होती. त्यामुळेच जीवन खूप सुंदर आहे मात्र ते जगता आले पाहिजे…. अशा आशयाची चिठ्ठी लिहून तिने गळफास लावून घेतला.

 

तिच्याजवळ सापडलेल्या या चिठ्ठीने अनेकांना अश्रू अनावर झालेत. वेदांत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संपूर्ण घटना शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. आरती वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरती तिच्या अन्य मैत्रिणींबरोबर रूम नंबर 44 मध्ये राहत होती. शुक्रवारी सकाळपासूनच ती थोडी अस्वस्थ होती.

 

तिच्या रूम मधील मैत्रिणी बाहेर गेल्याचे पाहून तिने शालच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. ज्यावेळी तिच्या मैत्रिणी पुन्हा आल्या तेव्हा आरतीला पाहून त्या भयभीत झाल्या. आत्महत्या करण्याआधी तिने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. तिच्याजवळ सापडलेल्या चिट्ठीमध्ये तिने आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. पोलिसांनी तिची चिट्ठी आणि तिचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तिने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close