आशा भोसले यांच्या नातीला पाहिलंत का? सुंदरतेच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना देखील टाकते मागे….

गानकोकिळा लता मंगेशकर यांनी या जगाची साथ सोडली आसली तरी त्यांच्या गाण्यांनी त्या अजरामर झाल्या आहेत. त्यांची गाणी ही सदाबहार आहेत. आशा भोसले यांनी देखील संगीत विश्वातील मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आता त्यांची नात देखील गायन क्षेत्रात नाव कमवत आहे.
आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले याला जनाई नावाची एक मुलगी आहे. जनाई आपल्या अजी प्रमाणे गायन क्षेत्रात झेप घेत आहे. तिची सुंदरता देखील अफलातून आहे. बॉलिवूडच्या एखाद्या अभिनेत्रीला लाजवेल एवढी ती सुंदर दिसते. तिच्या आवाजाचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
तिच्या सौंदर्यात अगदी निरागसपना दडलेला आहे. जनाईला गोड गळा आहे असे समजल्यावर तिच्या कुटुंबीयांनी लगेचच तिला शास्त्रीय संगीताचे धडे दिले. अशात लहानपणापासून अजी कडून तिला संगीताचं बाळकडू मिळाल आहे. त्यामुळे तिचे स्वर नेहमीच मंत्रमुग्ध करतात. गाण्याची आवड जोपासत जनाईने शास्त्रीय संगीत शिकलं आहे. तिने अनेक गाणी देखील गायली आहेत.
आशा भोसले या नेहमी आपल्या नातीला “तू लता दिदिंसारखी मोठी गायिका हो” असे सांगत असतात. आपल्या नातीला मार्गदर्शन करत असताना मुन्नी बदनाम हुई आणि साकी साकी अशी गाणी तू गाऊ नको असे देखील त्या म्हणतात.
जनाई सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती अनेक फोटो आणि गाण्याचे व्हिडिओ सोशल करते. तिची सुंदरता नेहमीच अनेकांच्या काळजावर राज्य करते. जनाईने कथ्थकमध्ये देखील विशारद मिळवली आहे. ती आपल्या आजी बरोबर अनेक कार्यक्रात गाणी गात असते.
जनाई 14 वर्षांच्या असताना तिला यश राज फिल्म कडून एक गाण्याची ऑफर आली. सिक्स पॅक बँड साठी तिने हिल पोरी हिला हे गाणं गायलं. सिक्स पॅक बँड हा तृतीयपंथींचा एक बँड आहे. त्यामुळे या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली. गळ्याला मिळत असलेली प्रसिद्धी पाहता तृतीयपंथींनी जनाईचे गोड शब्दांमध्ये आभार देखील मानले होते.
हिल पोरी हिला हे गाणं हिंदी मराठी इंग्रजी अशा तिन्ही भाषांचे मिश्रण होते. त्यामुळे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात हे गाणं गाजलं. याच्या प्रसिद्धीमध्ये जनाईचा खारीचा वाटा आहे. जनाई जितकी सारस आणि सुंदर आहे तितकीच ती ग्लॅमरस देखील आहे. तिचे अनेक कूल फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.