सर्प दंश झाला म्हणून तो आपल्या भावाच्या अंत्यविधीला आला आणि त्याचा देखील सर्प दंशाने झाला मृत्यू…..

उत्तरप्रदेश | सर्प, नाग, नाग मणी यांना इजा केल्यास ते आपल्याला लक्षात ठेवतात आणि बदला घेतात. असे तुम्ही आता पर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहिले असेल. मात्र हे आता प्रत्यक्षात देखील घडले आहे. सर्प दंश झाल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी त्याचा भाऊ आला होता मात्र त्याला देखील सर्प दंश होऊन त्याचा मृत्यू झाला.
ही भयानक घटना उत्तर प्रदेशच्या बलरामपूर गावात घडली आहे. गावात अरविंद मिश्रा नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो जेव्हा रात्री झोपला होता तेव्हा त्याला सापाने दंश केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वाऱ्याच्या वेगाने गावात पसरली. सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली.
अरविंदच्या अंत्यविधीला त्याचा भाऊ गोविंद देखील आला होता. विधी पूर्ण झाल्यावर एक रात्र त्याने गावात थांबण्याचा निर्णय घेतला. गोविंद हा अरविंद ज्या खोलीत झोपला होता त्याच खोलीत झोपला. यावेळी त्याला देखील सापाने दंश केला. यात त्याचे देखील निधन झाले.
या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गावकरी दुःखात तर आहेतच मात्र आता या घटनेमुळे पुरते भयभीत देखील झाले आहेत. हा सर्व प्रकार मंगळवारी घडला.
सदर घटनेची माहिती पोलिसांनी घेतली आहे. तसेच यावर अधिक तपास करत आहेत. वरिष्ठ वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गावाला भेट दिली आहे. स्थानिक आमदार कैलास शुक्ला यांनी देखील मिश्रा कुटुंबियांची भेट घेतली आहे.