धक्कादायक! मेहुणीमुळे पत्नी आणि सासूचा केला खून, दुःख सहन न झाल्याने स्वतः देखील केली आत्महत्या….

उत्तराखंड | प्रत्येक कुटुंबात मतभेद होत असतात. मात्र रागावर नियंत्रण न ठेवल्यास मोठे गुन्हे घडतात. नंतर आपल्या चुकीचा पश्चाताप होऊन अनेक व्यक्ती आत्महत्या देखील करतात. असाच प्रकार आता उत्तराखंड येथे देखील झाला आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीला आणि सासूला संपवून स्वतः देखील आत्महत्या केली आहे. या घटनेनं सगळीकडे शोक व्यक्त केला जात आहे.
सदर व्यक्तीचे आणि त्याच्या पत्नीचे एका कारणावरून भांडण झाले होते हे भांडण त्याच्या मेहुणीमुळे झाल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे. त्याने रागाच्या भारत सासू आणि पत्नीची हत्या केली. नंतर तो मुलांना घेऊन बहिणीकडे गेला. मुलांना तिथे सोडून नंतर तो फरार झाला. काही दिवसांनी एका रेल्वे रुळावर त्याचा मृत देह सापडला. तसेच त्याच्याजवळ एक चिठ्ठी देखील सापडली. यात त्याने असे का केले हे सर्व काही लिहिले आहे.
उत्तराखंड मधील उधमसिंगनगर जसपुर जवळ निखिल उर्फ सोनू नाथचे सासर होते. 8 वर्षांपूर्वी त्याचे निशू बरोबर दुसरे लग्न झाले होते. त्याला दोन मुलं आणि एक मुलगी होती. 27 फेब्रुवारी रोजी त्याने आपल्या पत्नीची आणि सासूची हत्या केली. त्यावर मंगळवारी पहाटे 5 च्या सुमारास त्याचा मृत देह सापडला. तो जसपूरचा रहिवासी होता आणि एका कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. त्याच्या मृतदेहाजवळ पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोट मध्ये त्याने आपल्या मेहुणीने घातलेल्या गोंधळामुळे त्याच्या हातून गुन्हा घडला असे त्याने म्हटले आहे.
यात त्याने लिहिले की, ” नितू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला तुला मारायचे नव्हते. पण तुझी बहीण पिंकी तुझ्या आणि सासूच्या दिक्यायत माझ्या विषयी चुकीच्या गोष्टी भरत होती. त्यामुळे वाद वाढले. आता मी तुझी हत्या केली आहे हे दुःख मला सहन होत नाही. त्यामुळे मी देखील तुझ्याकडे येत आहे. मला माफ कर.” असे त्याने यात लिहिले आहे. सदर घटनेत उधम सिंह नगर एसओजीचे प्रभारी कमलेश भट्ट अधिक तपास करत असून पिंकीची चौकशी सुरू आहे.