हनुमानाचे रूप धारण करून नाचत होता, दुसऱ्याच क्षणी कवटाळले मृत्यूने

उत्तरप्रदेश | सोशल मीडियावर नेहमीच मृत्यूचा थरकाप उडवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात वेगवेगळ्या भीषण अपघाताचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अशात आता आणखीन एक काळजाचा थरकाप उडवणारा मृत्यूचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हनुमान या देवाचे रूप धारण केलेल्या व्यक्तीला देवाने स्वतः कडे बोलावून घेतले आहे.
सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतं आहे त्यामध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती मंदिरात एका गाण्यावर अभिनय करत आहे. अचानक ही व्यक्ती खाली पडते. त्यामुळे अनेकांना वाटते की ते अभिनय करत आहेत. मात्र बराच वेळ ती व्यक्ती उठत नाही. मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा व्हिडिओ कैद झाला आहे.
सदर घटना ही मौनिपुर शहरातील आहे. इथे बंशीगौर येथील एका शिव मंदिरात गणपती बाप्पा विराजमान झाले होते. यावेळी बाप्पाच्या आगमनाची धामधूम आणि उत्सव साजरा करत असताना देवळात भजनाचा कार्यक्रम सुरू होता. याच वेळी रवी शर्मा हनुमान देवाची भूमिका साकारत होते. अचानक ते चक्कर येऊन पडले. त्यामुळे त्यांना नेमके काय झाले हे कुणाला समजले नाही.
इतर व्यक्तींनी त्यांना जवळील एका रुग्णालयात नेले. तिथे तपासून त्यांना मृत घोषित केले गेले. रवी शर्मा यांच्या आकस्मित निधनाने सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरले आहे. तसेच शिव मंदिरात असलेला भजनाचा कार्यक्रम देखील नंतर रद्द केला गेला. गणेश उत्सवात हा प्रकार घडल्याने सर्व भाविक आणि रवी यांचे कुटुंबीय यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.