हृदयद्रावक! उकळत्या पाण्यात पडून 7 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू; घटना वाचून डोळयात पाणी येईल

औरंगाबाद | औरंगाबाद मध्ये पाणी गरम करण्यासाठी लावलेल्या हितरच्या बादलीत पडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ होत आहे तर चिमुकलीचा कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्रेया राजेश शिंदे ही चार वर्षाची चिमुकली हात धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली. तिथे गरम पाणी करण्यासाठी ठेवलेल्या बादलीत पडली. गरम पाण्यामुळे श्रेयाच्या अंग पूर्ण भाजून निघाले. त्यामुळे तिच्या शरीरावर जखमा झाल्या . तिला रुग्णालयात दाखल केले परंतु दवाखान्यात घेऊन जाण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला.
राजेश शिंदे हे औरंगाबाद मधील कमलंनगर मध्ये राहत होते. राजेश शिंदे यांना साई हा सात वर्षाचा मुलगा तर चार वर्षाची श्रेया आहे. राजेश हा त्याची पत्नी आणि मुलगा व मुलगी याच्यासोबत राहत होता. राजेश हा कामावरून घरी आला होता त्यांनी अंघोळ करण्यासाठी हिटर लावला होता. आणि जेवण करायला बसले होते. श्रेया चे जेवण होऊन ती बाथरूम मध्ये हात धुण्यासाठी आली.
परंतु पाय घरून ती बादलीत पडली. त्यामुळे ती जोरात ओरडली .ती ओरडल्याने राजेश व पत्नी धावतच बाथरूम मध्ये आले. परंतु राजेश लाही विजेचा धक्का बसला. त्यांनी विजेची बरणे त्वरित बंद केली. भाजलेल्या श्रेयाच्या हॉस्पिटल मध्ये ते दोघेजण घेऊन गेले. पण उपचार चालू असतानाच श्रेया मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आपल्या लाडक्या चिमुकलीचा जीव डोळ्यासमोर गेल्याने तिच्या आई वडिलांनी आक्रोश करायला सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली.. परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. इवल्याशा चिमुरडीचा झालेला मृत्यू पाहून अनेकाची मने सुन्न झालीl