इतर

हृदयद्रावक घटना! आईने घेतला दोन वर्षांच्या मुलाचा जीव, १० वर्षांच्या मोठ्या भावाला शव घेऊन पायपीट करत यावं लागलं घरी…

बागपत | प्रशासनावर प्रचंड चिढ आणि मार्तुत्वाला काळींबा फासणारी एक घटना समोर आली आहे. ही बातमी वाचून कदाचित तुम्हाला देखील राग अनावर होईल. एका आईने आपल्या बाळाला रस्त्यावर फेकल्याने त्याला समोर येणाऱ्या गाडीने उडवले. यात त्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटने मुळे मातृत्व इतकं क्रूर कसं होऊ शकतं असा प्रश्न निर्माण होत आहे. उत्तर प्रदेशातील बागपत येथे ही घटना घडली आहे. यावेळी १० वर्षांचा मोठा भाऊ आणि त्या बाळाचे वडील त्या बाळाचा मृतदेह रस्त्यावर घेऊन जात होते. त्यांनी वाहन मिळवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांना कुणीच मदत केली नाही.

दिल्ली यमुनोत्री हायवे येथे हा प्रकार घडला आहे. यात सावत्र आई दोन मुलं आणि पती हे सर्व हायवेवरून जात होते. यावेळी राग आल्याने त्या आईने दोन वर्षांच्या मुलाला रस्त्यावर फेकले त्याच वेळी समोरून गाडी आली आणि तो मुलगा जोरात दुसरीकडे फेकला गेला. आपल्या भावाला वाचण्यासाठी त्या १० वर्षांच्या मोठ्या भावाने खूप प्रयत्न केले. मात्र तो आपल्या भावाला वाचवू शकला नाही.

भावाला हातात उचलून घेत त्याने आणि त्याच्या वडिलांनी रुग्णालय गाठले इथे दोन वर्षांच्या मुलाला मृत घोषित केले गेले. नंतर आपल्या मुलाचे पार्थिव घरी न्यायला रुग्णालयाने त्यांना वाहनाची देखील सुविधा उपलब्ध करून दिली नाही. यावेळी त्या भावाने आणि वडिलांनी त्याचा मृत देह आळीपाळीने उचलून घेत घरी आणला. रस्त्यात हे दोघे बाप लेक त्या बाळाचा मृत देह घेऊन जात होते मात्र त्यांच्या मदतीसाठी कोणीच आले नाही.

वडील भावाचा मृत देह घेऊन थकल्यावर १० वर्षांचा भाऊ तो मृतदेह घेत होता. सोशल मीडियावर ही घटना प्रचंड व्हायरल होतं आहे. झालेली घटना ही प्रशासनावर ताशेरे ओढण्या लायक आहे. असे अनेक जण म्हणत आहेत. तसेच हा प्रकार पाहून अनेक व्यक्ती यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आहेत. सादर घटनेत पोलिसांनी त्या सावत्र आईला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच मुलाच्या मृत्यूची नोंद केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close