हॉलिवूड हादरल! हॅरी पॉटर चित्रपटातील बड्या कलाकाराला जिवे मारण्याची आली धमकी….

मुंबई | मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गायक सिद्धू सिंग मुसेवाला याच्या निधनानंतर अनेक गायकांना आणि कलाकारांना धमकीचे फोन येत होते. बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला देखील धमकीचे फोन आले होते. त्याचबरोबर हिंदी सिनेसृष्टीतील अनेक गायकांना देखील धमकीचे फोन आले होते. याची प्रत्येकाने पोलिसात तक्रार देखील केली. आता अशीच एक धमकी एका प्रसिद्ध लेखिकेला देखील आली आहे.
काही दिवसांपूर्वी मिका सिंग या अभिनेत्याला देखील धमकीचे मेल आले होते. त्यावेळी त्याने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तसेच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याला आलेल्या धमक्या सांगितल्या होत्या. मिका सिंग या दिग्गज गायकानंतर पंजाबी गायक जानी जोहान याला देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यावेळी भयभीत होऊन त्याने देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता.
अशात आता एका हॉलीवुड लेखीकेला धमकी आली आहे. चाकूने वार करून तिची हत्या केली जाईल अशा पद्धतीची धमकी तिला मिळाली आहे. ही लेखिका दुसरी तिसरी कोणी नसून हॅरी पॉटर या चित्रपटाच्या लेखिका जेके रोलिंग आहेत. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती त्यांना जीवे मारण्याच्या धमक्यांचे मेसेज येत आहेत.
कोणत्या कारणावरून आली धमकी-काही दिवसांपूर्वीच भारतीय जन्म असलेले ब्रिटिश वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांची हत्या केली गेली. एका कार्यक्रमामध्ये भाषण देण्यासाठी उभे राहिले असता दोन-तीन व्यक्ती त्यांच्या जवळ आल्या. त्या व्यक्तींनी रश्दी यांना घेरलं तसेच त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले गेले.
यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक व्यक्तींनी या घटनेचा निषेध व्यक्त केला होता. सोशल मीडिया मार्फत अनेक व्यक्तींनी यावर आपलं मत मांडलं होतं. या घटनेवर जेके या प्रसिद्ध लेखिकांनी देखील स्वतःचे मत मांडले. त्यांनी ट्विट करत म्हटले की, ” झालेल्या घटनेमुळे मी खूप दुःखी आहे, रश्दी लवकरात लवकर बरे व्हावे.” त्यांच्या या ट्विट वरती एका व्यक्तीने कमेंट करत म्हटले आहे की, ” दुखी होऊ नका कारण पुढचा क्रमांक तुमचा आहे.”
या धमक्यांमुळे त्यांना संरक्षणाची गरज आहे असे समजते. सोशल मीडियावर त्यांना अशा पद्धतीच्या अनेक धमक्या आल्या आहेत. या धमक्यांचे स्क्रीनशॉट काढत त्यांनी सोशल मीडिया वरती शेअर केले आहे. हे स्क्रीन शॉट शेअर करत त्यांनी ट्विटर वरती निशाणा साधला आहे.
यावर त्यांनी लिहिले आहे की, ” ट्विटर हीच तुमची सुरक्षितता आहे ना? आम्ही या धमकीचा निषेध करतो. अशा पद्धतीने येणाऱ्या सर्व धमक्यांना मी नाकारते.” असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. सलमान रश्दी त्यांच्या तब्येतीविषयी बोलायचे झाल्यास, त्यांच्यावरती जास्त घाव केल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. यामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तसेच सध्या त्यांची प्रकृती ही स्थिर आहे.