विशेष

भयानक घटना: लग्न मंडपामधून नवरीला ओडत आणून लटकले फासावर. वाचून येईल डोळ्यात पाणी

Horrific incident: Bride being dragged from wedding hall

जालना :  जालना तालुक्यामध्ये घडलेली भयानक घटना घडली आहे. एका मंदिरात लग्नाची तयारी चालू होती. मुलाचे व मुलीचे एकमेकांवर प्रेम होते. ते या आधी पळूनही गेले होते. तो तिच्याच आत्त्याचा मुलगा होता. आगोदर त्यांच्या लग्नाला घरच्यांची परवानगी देण्यात आली नव्हती तरी हट्ट धरून लग्न लाऊन देण्यास मानवले.

लग्न हे या आटी वर ठरले की लग्न लागण्या अगोदर मुलीच्या नावावर अर्धा एकर शेती करण्याची ठरवले होते. परंतु तसे न झाले नाही. अगोदरचा राग अन् त्यात ठरल्या प्रमाणे न झाल्याने मुलीच्या वडिलांनी आणि काकांनी मुलीलाच फासावर लटकवले ची घटना जालना तालुक्यात घडली.

मिळालेल्या माहिती नुसार सुर्यकला संतोष सरोदे हीचे लग्न तिच्याच आत्याच्या मुलाबरोबर लावण्यात येणार होते. परंतु काही अडचण आल्यामुळे मुलीच्या नावावर जमीन करण्यास नकार मिळाला होता, त्यामुळे मुलीच्या काकांनी आणि बापानी बदनामीचा राग मनात धरून नवरीला मंडपातून आणून घरासमोरील लिंबाच्या झाडाला फास दिला. त्यानंतर त्या दोघांनीच सरण रचून मुलीला जाळून देखील टाकले. आणि तिची राख दोन पोत्यमध्ये भरून ठेवली. ज्या जागेवर मुलीला जाळण्यात आले तेथे रांगोळी देखील घालण्यात आली.

सुर्यकलाच्या वडिलांचे नाव संतोष भाऊराव सरोदे आणि काकाच नाव  नामदेव भाऊराव सरोदे हे आहे. सुर्यकला ही अकरावी मध्ये शिकत होती. तिच्या आत्याच्या मुलाचे व तिचे प्रेम होते. ते दोघेजण पळून सुधा गेले होते. दोन्ही घरच्यांनी तुमचे लग्न लाऊन देतो असे सांगून बोलवून घेतलं.

मंगळवारी त्यांचे लग्न लावण्याचे ठरवले होते. लग्न लावण्याच्या निमित्ताने दोघांनाही बोलावून घेतल. परंतु  मुलीच्या काकांनी मुलीच्या नावावर अर्धा एकर शेत करण्याची अट घातली गेली.  त्या मागणीला नकार आल्यामुळे मुलीच्या बापाने आणि काकाने मुलीला मंडपातून ओढत आणले होते. आणि घराच्या दारा समोर असलेल्या लिंबाला फाशी दिली.

त्या दोघांनीच जाळून तिची राख पोट्यामध्ये भरून ठेवली. गावातील लोकांना घटना समजून गेली . गावातील लोकांचे त्यांच्या घरी येणे जाणे चालू होते.  घरामध्ये आई व बहीण रडत होत्या. घरातील मंडळी घटना घडत असताना हजर होती परंतु कोणीही या घटनेला विरोध का केला नाही.

असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहेत. अशी ही हृदय पिळवटून टाकणारी घटना जालना तालुक्यातील पिंपळवाडी गावात घडली. या घटनेमुळे गावातील नागरिक देखील संतप्त झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close