मनोरंजन

लैंगिक अत्याचाराने पीडित असलेल्या अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना…

स्त्रियांवरील होणारे अन्याय अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यामध्ये अनेक महिला परखडपणे आपले मत मांडतात. तर काही महिला हे सर्व अत्याचार सहन करत असतात. समाजात अशा अनेक महिला आहेत ज्या लैंगिक अत्याचाराच्या शिकारी झाल्या असून देखील त्यांच्याकडे गुन्हेगाराच्या नजरेने पाहिले जाते. त्यांचे संपूर्ण अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र संबंधित खरे गुन्हेगार हे बाहेर मोकाट फिरत असतात. खेड्यापाड्यांमध्ये या घटना सर्वाधिक घडतात. मात्र आता ही घटना एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वाटेला देखील आली आहे.

 

दक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भावना मेनन ही गेल्या पाच वर्षांपासून आपल्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल काहीच बोललेली नाही. मात्र आता तिचे संपूर्ण अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही असे तिने ठरवले आहे. अभिनेत्रीने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. एका व्यक्तीने तिच्यावरती बलात्कार घडवून आणला. तसेच या सर्व व्यक्ती बाहेर बिनधास्त फिरत आहेत. यासह तिच्या वैयक्तिक जीवनात आणखीन अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही अभिनेत्री खूप मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. तसेच आता तिने गप्प न बसण्याचा निर्णय घेतला आहे.

 

अभिनेत्रीवर तिचाच सहकलाकार दिलीप याने बलात्कार घडवून आणला. सदर घटना १७ फेब्रुवारी २०१७ रोजी घडली. या दिवशी ती आपले शुटींग संपवून घरी निघाली होती. ती जेव्हा गाडीत बसली तेव्हा गाडीमध्ये आधीच काही व्यक्ती होत्या. त्यांनी तिला बेशुद्ध करून तिला किडनॅप केले. त्यानंतर एका ठिकाणी तिने नेऊन १० व्यक्तींनी सगळ ४ तास तिच्यावर अत्याचार केला.

 

या मध्ये तिचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र तिने तिथून कसा बसा पळ काढला. यावेळी तिने लगेचच पोलिसात तक्रार दाखल केली होती. दिलीप तसेच अन्य ७ व्यक्तींना पोलिसांनी पकडले होते. मात्र जामिनावर ही सर्व मंडळी आता बाहेर आहेत. तसेच तिच्या आयुष्यात आणखीन अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, ” मी आशा करते की, अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होण्यासाठी माझ्यासारखी धडपड कुणालाही करावी लागू नये. लैंगिक अत्याचाराची शिकार होण्याचा आणि त्या वेदनांसह जगण्याचा प्रवास काही सोपा नाही. लैंगिक अत्याचाराच्या ओझ्याखाली पाच वर्षांपासून माझी ओळख दडपली गेली आहे. मी गुन्हा केलेला नाही. तरीही मला अपमानित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.” असे तिने म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close