इतर

इंस्टाग्रामवर ओळख,फोटोशूट साठी बोलावून फोटोग्राफर तरुणाची हत्या,फेसबुकच्या मदतीने आरोपींना बेड्या!

विशाखापट्टणम:- आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम शहरात राहणाऱ्या साईकुमार नावाच्या फोटोग्राफरची तरुणाची दोन तरुणांनी हत्या केली आहे.26 फेब्रुवारी 2024 रोजी विशाखापट्टणम वरून राजमुंद्री या ठीकाणी फोटो शूटसाठी निघालेला साई कुमार त्या ठिकाणी पोहोचलाच नाही तेव्हा या संपूर्ण घटनेची माहिती मिळालेली आहे.

3 मार्च रोजी आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील मूलस्थानम गावात साईकुमारचा वाळूच्या ढिगाऱ्यात मृतदेह मिळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

फोटो शूट साठी घरून निघालेल्या साईकुमारची हत्या कोणी केली?पोलिसांनी आरोपींना कसे शोधून काढले?आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊयात.

आधी बेपत्ता असल्याची तक्रार मग हत्या…..

विशाखापट्टणम मधील मदुरावाडा या ठिकाणी साईकुमार आपल्या कुटुंबासोबत राहत होता.व्यवसायाने तो एक फोटोग्राफर असल्याने जिथे ऑर्डर मिळेल तिथे लग्न तो फोटो शूट साठी जात असे.लग्न समारंभ,प्रि-वेडिंग यांसारख्या समारंभासाठी फोटो आणि व्हिडिओ काढण्याचे काम तो करत होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून करत असल्याने त्याला फोटो शूट आणि व्हिडिओ शूटिंग साठी ऑनलाईन ऑर्डर देखील येत होत्या.त्यासाठी तो दूरदूर जात होता अशी माहिती त्याच्या कुटुंबाने दिली आहे.

साईकुमारचा मृत्यू होण्याआधी त्याला इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती.त्यातून त्याला फोटो शूट साठी ऑनलाईन ऑर्डर मिळाली होती.

आंबेडकर कोनासिमा जिल्ह्यातील पोथीना षण्मुख तेजा वय वर्ष 20 आणि विनोदकुमार वय वर्ष 20 हे दोन तरुण त्याच्याशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून मागील तीन महिन्यांपासून संपर्कात होते.त्यांनी 16 फेब्रुवारीला साईकुमारला फोन करून फोटो शूट साठी 27 फेब्रुवारीला रावुलापलेम या ठिकाणी येण्यास सांगितले.अशी माहिती विशाखापट्टणमचे पोलिस उपअधीक्षक चंदू मनिकंथा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

त्या दोन तरुणांनी साईकुमारला सांगितले की हा कार्यक्रम 10 ते 15 दिवस चालणार आहे त्यासाठी आवश्यक ते सर्व उपकरणे येताना घेऊन ये.तसेच हा कार्यक्रम यशस्वी झाल्यास चित्रपट शूट करण्याची संधी मिळणार आहे.

त्यामुळे साई कुमार 26 फेब्रुवारी रोजी कॅमेरा आणि इतर आवश्यक उपकरणे घेऊन आपण रावुलापलेम येथे जात असल्याचे सांगून तो तिथे जाण्यासाठी ट्रेनने निघाला.

साईकुमार ट्रेनने राजमुंद्री रेल्वे स्थानकावर पोहोचला तेव्हा त्याला घेण्यासाठी पोथीना षण्मुख तेजा आणि विनोदकुमार हे दोन तरुण कार घेऊन आले आणि साई कुमारला त्यांच्या सोबत घेऊन गेले.

रात्री आठ वाजताच्या सुमारास पोथीना षण्मुख तेजा वय आणि विनोदकुमार आणि साई कुमार हे सोबत बिअर प्यायले.त्यानंतर साईकुमार तेथून निघून गेला.पण या दोन आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याच्या गळ्यात पट्टा बांधून त्यांनी साईकुमारची हत्या केली.त्यानंतर मध्यरात्री मुलस्थानम गावातील वाळूच्या ढिगाऱ्यात त्याचा मृतदेह पुरण्यात आला.आणि साईकुमारचा कॅमेरा आणि इतर उपकरणे घेऊन आरोपी तिथून पळून गेले.असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून आपला मुलगा बेपत्ता असल्याने साई कुमारच्या पालकांनी 29 फेब्रुवारी रोजी मल्ल्यापालेम पोलिस ठाण्यात साई कुमार बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आपली तपासाची सूत्रे हलवून आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले.साई कुमारच्या कॉल रेकॉर्डिंग आणि त्याला रेल्वे स्थानकावर घेण्यासाठी आणलेल्या कारच्या नंबरवरून पोलिसांनी सदरची कार कोणाची आहे हे शोधून काढले.पोलिसांनी फोटो शूट साठी ऑर्डर देणाऱ्या पोथीना षण्मुख तेजाच्या नंबरवर कॉल केला तर तो नंबर बंद केला होता.

विशाखापट्टणम पोलिसांनी या घटनेची माहिती आंबेडकर कोनासिमा जिल्ह्यातील अलामरू पोलिस ठाण्याला दिली.
“त्यानंतर अलामरू पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी 1 मार्च रोजी पोथीना षण्मुख तेजाच्या घरी गेले.परंतु पोथीना षण्मुख तेजा घरी नव्हता.पण,साई कुमारने फोटो शूट साठी आणलेला कॅमेरा आणि इतर उपकरणे पोथीना षण्मुख तेजाच्या घरी आढळून आल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि त्याचा शोध सुरू झाला.”अशी माहिती सादर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी श्रीनिवास नाईक यांनी दिली.

षण्मुख तेजाच्या मैत्रिणीच्या मदतीने केला शोध

घरातून फरार झाल्यापासून षण्मुख तेजाचा मोबाईल नंबर बंद होता.त्यामुळे पोलिसांनी षण्मुख तेजाला पकडण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग केला.

षण्मुख तेजा आपल्या फेसबुक अकाऊंट करून कोणाशी चॅटिंग करत आहे याची माहिती पोलिसांनी शोधून काढली.त्यावेळी षण्मुख तेजा विशाखापट्टणम येथील मुलीशी चॅटिंग करत असल्याचे पोलिसांना आढळून आले.पोलिसांनी लगेच त्या मुलीशी संपर्क साधून तिला संपूर्ण घटना क्रम सांगितला आणि तिची मदत घेतली.

“सदर मुलीच्या फेसबुक अकाऊंट वरून षण्मुख तेजा सोबत चॅटिंग करून त्याच्या सध्याच्या ठिकाणचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला 2 मार्च रोजी अण्णावरम येथून ताब्यात घेतले.त्याने माहिती दिल्यानुसार विनोद कुमार या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता,षण्मुख तेजाने साईकुमारची हत्या केल्याचे कबूल केले आहे.”असे श्रीनिवास नाईक यांनी सांगितले.

कशामुळे केली साईकुमारची हत्या?

साई कुमारकडे महागडे कॅमेरे आणि इतर उपकरणे होती.ज्यांची किंमत 10 ते 12 लाख रुपये होती.ही उपकरणे मिळवण्यासाठी षण्मुख तेजा आणि विनोद कुमार यांनी साईकुमारची हत्या केली.

“संबंधित आरोपींनी साईकुमारला मागील तीन महिन्यांपासून सतत इंस्टाग्राम वरून गप्पा मारल्या आणि त्याला एक दिवसाचा फोटोशूट कार्यक्रम आहे असे सांगून राजमुंद्री येथे कॅमेरा आणि इतर उपकरणे घेऊन यायला सांगितले.आणि त्याची त्या दोघांनी मिळून हत्या केली,” अशी माहिती डीसीपी चंदू मणीकंथा यांनी सांगितली.

या घटनेमुळे साई कुमारच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close