स या अक्षरावरून मुलीचे नाव ठेवणार असाल तर ही बातमी जरूर वाचा….

बाळ झाल्यावर त्या बाळाचे नाव ठेवण्याची मोठी चर्चा असते. यामध्ये कुटुंबातील सर्वच सदस्य बाळाच्या नावासाठी वेगवेगळी नावं शोधत असतात. अशात प्रत्येकाला आपल्या बाळाचं नाव जरा हटके आणि अर्थपूर्ण ठेवायचं असतं. अशात आता जर तुम्ही देखील आपल्या मुलींसाठी काही नावं शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्या साठीच आहे.
मराठ मोळी अभिनेत्री स्वरांगी मराठे ही नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिला या आधी एक मुलगी झाली होती. आता देखील तिने एका गोड कन्येला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने आपल्या दोन्ही मुलींची नाव खूप सुंदर ठेवली आहेत. ही नावं तिने स हा अक्षरावरून ठेवली आहेत. तिच्या दोन्ही मुलींच्या नावाचा अर्थ देखील खूप छान आहे. कदाचित ही नावं ऐकून तुम्ही देखील तुमच्या नवजात मुलीला हे नाव द्याल.
अभिनेत्रीने आपल्या पहिल्या मुलीचं नाव सोयरा असं ठेवलं आहे. सोयरा म्हणजे नैसर्गिक सौंदर्य. तसेच सोयरा हे एका देवीचे नाव देखील आहे. या नावासाठी शुभ अंक हा ७ आहे. तसेच या नावाच्या मुली अतिशय धार्मिक असतात. यांच्यासाठी शुभ रंग हा हिरवा आहे. शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव देखील सोयराबाई होते.
अभिनेत्रीने आपल्या दुसऱ्या मुलीचे नाव सुहित असं ठेवलं आहे. सुहित या नावाचा अर्थ सकारात्मकता आहे. म्हणजे सर्व काही चांगले सर्वांच्या हिताचे होय. या नावाच्या मुलींची रास ही कुंभ असते तसेच या नावाच्या मुली फार गुणी असतात. स्वरांगीने आपल्या दोन्ही मुलींची नावे ही स या अक्षरावरून ठेवलेली आहेत.
या अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिची आभाळमाया ही मालिका खूप गाजली. या मालिकेतील चिंगी हे पात्र साकारले होते. याच पात्रामुळे ती घराघरात पोहोचली. आता ती आपल्या दोन्ही मुलींच्या पालनपोषणामध्ये व्यस्त आहे. तिने आपल्या दोन्ही मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या दोन्ही मुली खूप गोंडस दिसतात.