कृषी अपडेट

IMD Rain Alert: धोक्याची घंटा! राज्यात या भागात अवकाळी पावसाची शक्यता

Imd rain Alert in Maharashtra

मुंबई | भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजवरून येत्या पुढील आठवड्यात म्हणजेच 6 किंवा 7 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन दिवसाच्या कालावधीत कोंकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे या विभागात येणारे शेतकरी यांना सावध राहण्याचे सांगितले जात आहे. (Imd rain Alert)

 

या हवामान खात्याच्या अंदाजमुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढू लागली आहे. या अवकाळी पावसाचा परिणाम रब्बी हंगावर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगोदरच खरीप हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात वाया गेली होती. त्याची भरपाई रब्बी हंगामातील पिकांवर निघेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून गेली होती. (Avkali paus)

 

परंतु पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होणार आहे. खरीप हंगामातील कापसाचे पीक अजूनही शेतातच उभे आहे. राज्यातील अवकाळी पावसाच्या शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकऱ्यांची आणखी डोकेदुखी वाढत आहे. खरीप हंगामात मधून शेतकरी कसाबसा सावरला होता त्यातच नाशिक मध्ये तुरळक ठिकाणी पावसाळा सुरुवात झाली. पुढील काही दिवसात जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे. (Maharashtra havaman andaj)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *