इतर

पावसाचे दोन थेंब आणि महावितरणाची विद्युत पुरवठा खंडित करण्याकडे असलेली धाव….

पुणे | चार महिन्यांच्या तडपत्या कडक उन्हाळ्यात नागरिक अस्वस्थ झालेले असतात. अशात चातकाप्रमाणे प्रत्येक जण या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. अशात चार महिन्यांनंतर ढग दाटून येतात, कोकिळेची कुहू कूहू सुरू होते. पाऊस येतोय हे ती सर्वांना सांगत असते. सगळ आभाळ ढगांनी दाटून येतं. सर्वत्र नयनरम्य वातावरण पसरतं. आणि तापलेल्या जमिनीवर पावसाच्या सरी बरसतात. सगळीकडे मातीचा सुवास दरवळतो. सगळ काही विसवल्यासारखं वाटतं. अशात मध्येच या क्षणभर सुखाला विरझन लागतं आणि एमएसिबी वाले लाईट घालवतात. शी बाई आताच या मेल्यांना लाईट घालवायची होती, असं घरात कुणी ना कुणी म्हणतंच. मात्र तुम्हाला माहीत आहे का? महावितरण पाऊस पडल्या पडल्या लाईट का घालवतं? तर याची काही उत्तर आम्ही शोधली आहेत.

पहिल्याच पावसात लाईट जाणं यासरख दुःख कोणतचं नाही असं अनेकांना वाटत. मात्र ही लाईट जाण्याची कारण अनेक आहेत. यामध्ये जोरदार हवा सुटल्याने अनेकदा तारा एक मेकींना चिकटतात त्यामुळे त्यात बिघाड होऊन लाईट जाते, तर कधी पक्षांच्या स्पर्शाने देखील लाईट जाते. अनेकदा हवेमुळे रस्त्यावर झाडे उन्मळून पडतात त्यामुळे देखील विद्युत पुरवठा खंडित होत असतो. आता ही सर्व तर साधी कारणे झाली. पण ही कारण जरी साधी असली तरी यामुळे गेलेला विद्युत पुरवठा पुन्हा एकदा सुरळीत करताना त्या विद्युत वायरमनला जीव मुठीत घेऊन काम करावं लागतं. मग इथे रात्र दिवस न पाहता अनेक वायरमन काम करतात. आणि लाईट पुन्हा सुरळीत करतात.

आता बंद डोळ्यांनी पाहिलं तर वास्तव असंच दिसतं. पण जरा डोकं खाजवा आणि उघड्या डोळ्यांनी या सर्व प्रकाराकडे नीट पाहा. मुसळधार पाऊस पडला की, लाईट जाते हे खरं आहे पण ती फक्त मुंबईच्या उपनगरांमध्ये आणि खेड्यापाड्यांमध्ये. मुंबई सारख्या मोठ्या गागंचुबी इमारती असलेल्या या शहरात जरी लाईट गेली तरी ती फकत काही मिनिटांसाठी जाते. मग असा भेदभाव का? अनेकदा तर हवा नसताना शहरात काही दुर्घटना घडलेली नसताना फक्त थोडा पाऊस पडला तरी लाईट घालवली जाते. मग या मागे काय कारण आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं बॅटिंग केली. त्यामुळे हा अनुभव अनेकांनी घेतला. अशात आता थोडा आणखीन पुढचा विचार करू. पाऊस पडणे, झाडे पडणे, हवा सुटणे आणि इतर सर्व कारण मान्य करू पण मे महिन्यात आपल्या सोसायटीच्या ग्रूपवर “सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात येईल. आगामी पावसाच्या अनुषंगाने काम सुरू आहे….. या ठिकाणी लाईटीच्या पोल जवळ असलेले झाड कापण्याचे काम सुरू आहे…. तारांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.” अशा वेगवेगळ्या दुरुस्तीच्या कामांसाठी आधीच मे महिन्यात विद्युत पुरवठा खंडित केला जातो. मग तरी देखील पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी झाड उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या घटना घडतात. मग महावितरण मे महिन्यात नेमकी कोणती झाडं तोडत असंत?

कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर महावितरणाचे जे कर्मचारी मोठ्या हिमतीने विद्युत खांबावर चढून काम करतात आणि विद्युत पुरवठा सुरळीत करता त्यांना खरोखरंच सलाम आहे. मात्र त्याच्या आधी मे महिन्यात ज्या व्यक्ती कामं करतात त्यांचं काय? महावितण ही सर्वात मोठी सरकारी कंपनी आहे. येथूनच सर्वत्र वीजपुरवठा पोहचवला जातो. महावितरण त्यांचं काम नीट करत नाही असं अजिबात नाही मात्र मे महिन्यात एवढी दुरुस्ती करूनही कोणता पक्षी किंवा झाड न पडता जर विद्युत पुरवठा तासंतास खंडित होतं असेल तर याला जबाबदार कोण? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close