सोलापूर जिल्हाल्यात हळहळ! गणपती बाप्पाच्या दारातच गणेश भक्ताचा मृत्यु

टेंभूर्णी | गणेशोत्सवानिमित्त सगळीकडे जल्लोश दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सर्व काही बंद होते. यंदा सर्व काही सुट मिळाल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जात आहे. अशात वरून राजा देखील अनेक ठिकाणी हजेरी लावत आहे. त्यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळवारा देखील आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडणे, वीज पुरवठा तासंतास खंडित होणे हे प्रकार देखील घडत आहेत. दोन वर्षांनंतर सगळ्यांचा घरी मोठ्या थाटामाटात बाप्पा आले आहेत. त्यामुळे वीज गेल्यास अनेक व्यक्ती विद्युत पुरवठा लवकर सुरुळीत करण्याची मागणी करत आहेत.
मात्र टेंभुर्णी येथे एक दुःखद घटना घडली आहे. एका गणेश भक्ताला विजेचा करंट लागल्याचे त्याचा मृत्यू झाला आहे. मोबिन असे मृत युवकाचे नाव आहे. तो फक्त 19 वर्षांचा होता. घरी आणि मंडळात बाप्पा आल्याने त्याची खूप लगबग सुरू होती. पाहुण्यांची सगळी व्यवस्था प्रसाद या पासून सर्व छोटी मोठी कामे तो करत होता. आता त्याच्या निधनाने सर्व व्यक्ती मोठ्या दुःखात आहेत.
तसेच ऐन गणेश उत्सवात हा धक्कादायक प्रकार घडल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. परिसरातील अनेक व्यक्ती त्याला सोशल मीडिया मार्फत आता श्रद्धांजली वाहत आहेत. थाटामाटात सुरू असलेल्या बाप्पाच्या सेवेत हा प्रकार घडल्याने सर्व भाविक हळहळ व्यक्त करत आहे.