विरार मध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीचा घराजवळच मृत्यू, जवळ आईवडील असतानाही काही करू शकले नाहीत.

विरार : काळ कोणाचं कधी येईल आणि,कोणाचं मृत्यू कशात असेल हे सांगता येत नाही. MSEB ने केलेल्या हलगर्जी पणामुळे दहावीत शिकणाऱ्या एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मुलीचा भयानक मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.तर MSEB ने केलेल्या हलगर्जी पणामुळे लोकातून संताप व्यक्त होत आहे.
या दुर्घटनेत तनिष्का कांबळे ही विद्यार्थिनी मृत झाली आहे . तनिष्का ही दहावीच्या वर्गात शिकत होती. कांबळे कुटुंब हे विरार मधील कृष्णा नगर मध्ये राहत होते. गेल्या काही दिवसात या ठिकाणी पाऊस पडत होता त्यामुळे सगळीकडे ओली जागा होती.
तसेच रस्त्यावर देखील पाणी साचलेले होते. या पाण्यामधून MSEB ची वायर गेली होती. ही वायर पाण्याच्या ठिकाणीच कट देखील झाली होती. त्यामुळे या पाण्यात करंट पसरला होता . तनिष्का या पाण्यातून गेली असता तिलाही करंट बसला. या विजेच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला.
तनिष्का चा मृत्यू हा तिच्याच घराजवळ झाला. जर MAEB ने वेळीच लक्ष देऊन ही वायर दुरुस्त केली असती तर आज ही दुर्घटना झाली नसती. तनिष्का आज वाचली असती. Mseb ने केलेले दुर्लक्ष आज एका निरपराधी मुलीचा जीव गेला.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली