IPS असून पठ्ठ्यानी पुन्हा UPSC मध्ये मारली बाजी; आईचे अश्रु अनावर

सातारा | साध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा निकाल लागला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२१ चा रिझल्ट सोमवारी (३० मे) रोजी जाहीर झाला. यंदाच्या वर्षी सुद्धा मुलींनी बाजी मारलेली पाहायला मिळत आहे. तसेच मराठवाड्यातील मुला मुलींनी या परीक्षेत यश मिळवत परत मराठवाड्याचा नाव मोठं केलं.
असा असताना साताऱ्याच्या तरुणाने या परीक्षेत बाजी मारली आहे. ओंकार पवार हा गेल्या वर्षी झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ४५५ व्या क्रमांकाने ऊतीर्ण झाला होता. ओंकार हा साध्या आयपीएस अधिकारी म्हणून रुजू आहे. गेली दोन वर्षे झाली ओंकार आपल्या गावात राहूनच परीक्षेची तयारी करत होता.
तो साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सणपने गावचा रहिवासी पण UPSC मध्ये येवढे मोठे यश मिळवणारा गावातील पहिलाच ठरला आहे. त्यामुळे गावच नाव संपूर्ण महाराष्टराप्रमाणेच भारतात झाले. ओंकार ने परत परीक्षा देत देशात १९४ वा क्रमांक पटकावला आहे.
ओंकार पवार गेली दोन वर्षे गावाकडे राहूनच परीक्षेची पूर्व तयारी करत होता. त्याच्या आईने स्वतःच्या डोळ्या समोर मुलाचे कष्ट पाहिले आणि आता त्याचं यश बागितले त्यामुळे प्रशांत यांच्या आई ला अश्रु अनावर झालेल पाहायला मिळाले. प्रशांत यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड होईल.