विशेष

पालकांना सावध राहण्याची काळाची गरज बनली आहे. मोबाईलमुळे झालं अस की १२ वर्षाच्या मुलाचा गेला जीव, वाचून डोळयात पाणी येईल 

नागपूर:  नागपूर मध्ये एका १२ वर्षाच्या मुलाचा धक्कादायक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मुलाने मोबाईल ॲप वरून व्हिडिओ पाहून तशीच कृती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच त्याच्या गळ्याला फाशी लागली.मोबाईल मधून पाहून तशीच कृती करत असताना त्या मुलाला जीव गमवावा लागला. ही घटना नागपूर येथील परिसरात घडून आली. या घटनेत मृत पावलेल्या मुलाचे नाव अग्रण्य सचिन बारापत्रे असे आहे.

नागपूर येथील पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन बारा पत्रे हा नानासाहेब राऊत यांच्याकडे भाडेने राहतो. अग्रण्या हा दुपारच्या वेळी टेरेसवर खेळण्यासाठी गेला होता. अग्रण्य चे वडील बाजारात गेले होते. तर आई ही घरकाम करत होतो. या वेळी अग्राण्या हा पतंग उडवत होता. काही वेळ तो टेरेसवर खेळत राहिला. त्याला खेळताना आजू बाजूला तेथील नागरिकांनी पाहिले होते.

काही वेळाने लोकांना वडणीने फाशी घेतलेला दिसला. तिथं असणाऱ्या नागरिकांनी घर मालक किशोर चिखली तसेच अगरण्य याचा आईला ही माहिती दिली. या सर्वांनी मिळून अग्रण्य याला फसावरून खाली काढले आणि हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. तेथे गेल्यावर डॉक्टरांनी या मुलाला चेक केले असता मृत घोषित केले. अग्रण्य याचे वडील हे इलेक्ट्रिक संबंधित काम करतात.तर आई गृहिणी आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले.त्यावेळी या अग्रन्य बाबतीत तपास सुरू केला. या तपासात परिसरा असेल दिसून आली की अग्रन्य ला मोबाईलची आवड होती. अग्रण्य हा सतत मोबाईल मध्ये खेळत असायचा. त्यांनी मोबाईल मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एप्लीकेशन घेतले होते. याच एप्लीकेशन वरील तो वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहत होता. गळ्यात दोर अडकून परत कसा काढायचा हा व्हिडिओ तसेच बघत होता.

या व्हिडिओमध्ये असल्याप्रमाणेच तो कृती करायला गेला होता. त्यावेळी त्याला फास लागला आणि मृत्यू झाला. असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या मुलाचे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून घेतली. सचिन बारापत्री यांना अग्रन एकुलता एक मुलगा होता. त्याच्यावर एम्स या हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. तो कोणत्याही गोष्टीवर लगेच रिऍक्ट होत असे.त्यामुळेच त्याचा स्वभाव देखील अतिशय तापट बनला होता. या अग्रन्य ला मानसिक आजाराच आजार देखील होते. यासाठी त्याला औषध चालू होते.

पालकांनी अशी घ्यायला हवी काळजी.आपली मुले मोबाईल मध्ये कोणत्या गोष्टी पाहतात याकडे सर्व पालकांनी लक्ष दिले पाहिजे. जे ॲप गरजेचे नाही ते मोबाईल मधून डिलिट करावे.मुलांमध्ये कोणता बदल झाला याकडे लक्ष द्यावे.असे आवाहन पोलिसांनी तेथील नागरिकांना केले.या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.पुढील तपास पूर्ण झाल्यावर अधिक माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close