इतर

महाराष्ट्राने अजून एक सुपुत्र गमावला; जळगाव मधील जवानशाहिद

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्या मधील भातखंडे गावामधील सैन्यदलातील दत्तात्रय  रेल्वे प्रवासात वीर मरण आले.  दत्तात्रय विठ्ठल पाटील हे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. पोलीस निरीक्षकांनी व तहसीलदार साहेबांनी जवान दत्तात्रय यांच्या कुटुंबियां ची भेट घेउन माहिती घेतली. मुकेश हिवाळे यानी मुलाखती दरम्यान माहिती दिली की शासकीय ठिकाणी त्याचे अंत्यसंस्कार होणार आहेत.

तरुण जवान दत्तात्रय व त्याचे युनिट बिकानेर वरून आगरतल ठिकाणी रेल्वे ने जात असताना प्रवासात त्याची अचानक तब्बेट बागडल्याचे समजते. त्यानंतर लगेच त्यांच्या वर उपचार करण्यात आले डॉक्टरांनी अथक प्रयत्नांनी त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. त्यानंतरच त्याचे पार्थिव शरीर हे अलाहाबादच्या आर्मी हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आले. दत्तात्रय  यांचे पार्थिव शरीर  वाराणसी ते  मुंबईपर्यंत विमानाने आणण्यात येणार आहे, मुंबईहून जळगावला  मंगळवारी दुपार पर्यंत नेण्यात येईल. दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवा शरीरावर  शासकीय इतमामात अंत्य संस्कार होणार आहे.

तरुण जवान दत्तात्रय हे २००३ मध्ये नाशिकमध्ये सैन्यात आपले कर्तव्य बजावण्यासाठी भरती झाले होते. ते ३०५ फिल्ड रेजिमेंटमध्ये सेवेत होते. त्यांचे प्रशिक्षण हैदराबाद आणि बंगळूर या ठिकाणी पूर्ण केलें. दत्तात्रय यांनी जम्मू, बिकानेर, लेह, लडाख या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावल आहे. त्यांची बिकानेर येथून आगरतळा या ठिकाणी पोस्टिंग झाली होती. जवान दत्तात्रय पाटील यांच्या मृत्यूने जळगाव जिल्हावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close