सियाचीन येथे मोहिमेवर तैनात असलेल्या साताऱ्याच्या आणखीन एका जवानाला आले वीर मरण

सियाचीन येथे मोहिमेवर तैनात असलेल्या साताऱ्याच्या आणखीन एका जवानाला आले वीर मरण
भारताच्या आणखीन एका जवानाला वीर मरण आलं आहे. सियाचीन येथील ग्लेशियर येथे ऑपरेशन मेघदूत सुरू होते. या मोहिमेत दिलीप इंगवले हे जवान देखील शमील होते. दरम्यान त्यांच्या डोक्यावर बर्फाचा मारा झाला. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
विपुल इंगवले हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे या गावचे रहिवासी होते. त्यांच्या निधनाने आता संपूर्ण गावावर आणि कुटुंबीयांवर मोठा दुखः चा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील सर्व व्यक्ति ओक्साबोक्षी रडत आहेत.
विपुल यांना मोहिमेत बर्फाचा मार लागला तेव्हा त्यांच्या डोक्यातील नसांवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे त्यांना नवी दिल्लीत हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार झाल्या नंतर त्यांना बरे वाटत होते. त्यामुळे आरमासाठी त्यांना त्यांच्या घरी गावी पाठवण्यात आले.
यादरम्यान ३ ते ४ महिन्यांनंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली त्यामुळे त्यांना पुण्यातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मृत्यूशी असलेली ही झुंज ते हारले आणि ५ जून रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज ६ जून रोजी त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
विपुल यांचं वय अवघं २६ वर्षे होतं. २०१६ साली ते सैन्यात भरती झाले होते. गोव्यात त्यांचं सैनिकी प्रशिक्षण पूर्ण झालं होतं. त्यानंतर सिग्नल रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. वर्षभरापर्वीच सियाचिन ग्लेशियर येथे त्यांची बदली झाली होती. यावेळी ऑपरेशन मेघदूतमध्ये ते सहभागी झाले होते.
त्यांच्या निधनाने आता संपूर्ण गाव मोठी हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, नऊ महिन्यांची लहान मुलगी, आई वडिल, एक भाऊ आणि दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. पतीच्या निधनानंतर आता आपल्या बाळाची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली आहे.