या मुळे करीना आणि अनन्याच्या घरी आले होते पोलीस, कारण आहे खूप मोठं…

मुंबई | कलाकारांच्या घराबाहेर नेहमीच चाहते आणि पत्रकार यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मात्र काही दिवसांपूर्वी दोन अभिनेत्रींच्या घरा बाहेर पोलीस आलेले दिसले. त्यामुळे आणखीन मोठी खळबळ उडाली.
करीना कपूर खान आणि अनन्या पांडे या दोन अभिनेत्रींच्या घरी पोसली आले होते. त्यावेळी या दोघींनी सुद्धा अ’मली पदार्थांप्रकरणी काही केलं की काय अशी चर्चा रंगली होती.
मात्र पोलीस नेमके त्यांच्या घरी का गेले होते या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. खरं तर पोलीस या दोघींना कोणत्या गुन्ह्यात चौकशी साठी नाही तर एक आमंत्रण देण्यासाठी गेले होते.
विरलभायानी या इंस्टाग्राम अकाउंटवर याची माहिती मिळाली आहे. त्याने या दोघींचा एक व्हिडिओ पोस्ट करत खाली ही माहिती लिहिली आहे. त्यामुळे करीना आणि अनन्या या दोघींच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
दोघींच्या घरी पोसली आले आहेत हे ऐकून पोसली खूप चिंतेत होते. आता करीना म्हणजेच बॉलिवूडची बेबो सोशल मीडियावर तर नेहमीच चर्चेत असते. ती आपल्या चात्यांसाठी सतत काही ना काही शेअर करत असते. लवकरच ती लालसिंग चढ्ढा या चित्रपटात दिसणार आहे.
तसेच अभिनेत्री अनन्या पांडे ही देखील आता तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. नुकतीच तो गेहराइया या चित्रपटात दिसली होती. अशात आता लवकरच विजय देवरकोंडा बरोबर ती लाइगर चित्रपटात झळकणार आहे.