इतरमनोरंजन

करीना कपूरला नेमका कशाचा माज; बॉलिवूडच्या या अभिनेत्रींबरोबर केली आहेत जोरदार..

मुंबई | मंडळी बॉलिवूडच्या बेबोने आजवर दमदार अभिनयामुळे  चाहत्यांची गर्दी स्वतःकडे खेचून घेतली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? करीनाचे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींबरोबर वाद राहिले आहेत. तसेच यातील काही अभिनेत्रींना, तर बेबोचं तोंड पाहण्याची देखील इच्छा नाही. त्या अभिनेत्री नेमक्या कोणत्या आहेत हेच या बातमीतून पाहणार आहोत.

 

ऐश्वर्या राय-

ऐश्वर्या आणि बेबोमध्ये भांडण होन साहजिकच होतं. कारण अभिषेक बरोबर करिष्माचा साखरपुडा ठरला होता. जो नंतर मोडला आणि अभिषेकने ऐश्वर्या बरोबर लग्न केलं. पण या दोघींमध्ये भांडण व्हायचं हे एकच कारण नाही. साल २०१० मध्ये करीनाचा ‘गोलमाल 3’ आणि ऐश्वर्याचा ‘ॲक्शन रिप्ले’ एकाच दिवशी रिलीज झाला होता तेव्हा करीना म्हणाली होती की, “गोलमाल हा एक ब्रँड आहे. आणि ऐश्वर्या पेक्षा लोक माझा चित्रपट पहिले पाहतील.” पण त्यावेळी ऐश्वर्याला या सर्व गोष्टींचा काहीच फरक पडला नाही. कारण तेव्हा ती फक्त बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूड स्टार देखील बनली होती.

 

प्रियांका चोप्रा-

‘ऐतराज’ या चित्रपटामध्ये करीना आणि प्रियांकाने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. पण शुटिंग दरम्यान देखील या दोघींमध्ये बर्‍याचदा खटके उडाले. एकदा तर कॉफी विथ करण या शो मध्ये करीनाने प्रियंकाच्या इंग्लिश बोलण्याची खिल्ली देखील उडवली होती. तसेच त्यावेळी दोघीही एकाच अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या होत्या. शाहिद कपूर बरोबर करीनच ब्रेकअप झाल्यानंतर प्रियांका बरोबर त्याच नाव जोडलं जातं होत.असो पण आता तर दोघींचीही लग्न झाली आहेत. मात्र तरी देखील प्रियांका करीना बरोबर दोन हात लांब राहणंच पसंत करते.

 

दीपिका पदुकोण-

दीपिका ही बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनय क्षेत्रात ती करीनाची जुनिअर असली तरी करीनाच्या प्रत्येक टीकेवर ती सडेतोड उत्तर देण्यास कधीच मागे राहत नाही. राम लीला चित्रपटामध्ये सुरुवातीला करीना झळकणार होती. पण तिने हा चित्रपट नाकारला आणि त्यामुळे रामलीलामध्ये दीपिका दिसली आणि ती यामधून भलतीच हिट झाली. मग करीना तिच्यावर जळू लागली. अनेक मुलाखतींमध्ये तिने दीपिकावर निगेटीव्ह कमेंट देखील केल्या आहेत. पण करीना शेर तर दीपिका सव्वा शेर. कॉफी विथ करणमध्ये दीपिका करीनावर पलटवार करत म्हणाली की, करीना अभिनयाव्यतिरिक्त काही करू इच्छित असेल, तर तिने दानधर्म सुरू करावा. कारण ती तिचे बरेच रोल अनेकांना दान करत असते. यावेळी दोघींमध्ये चांगल शित युद्ध झालं होतं.

 

अमिषा पटेल-

करीना आणि अमिषामध्ये ‘कहोना प्यार है’ या चित्रपटापासूनच वाद राहिले आहेत. राकेश रोशन यांनी या चित्रपटासाठी आधी करीनाची निवड केली होती. परंतु करीनाचं वागणं पाहून त्यांनी तिला या चित्रपटातून काढून टाकलं होतं. त्यानंतर हा चित्रपट पोहचला अमिषा पटेल कडे. चित्रपट हिट झाल्यानंतर करीना अमिषावर खूप जळू लागली. ती अनेकदा “अमिषा ही सुंदर अभिनेत्री नाही आणि चित्रपटामध्ये तिच्या चेहऱ्यावरचे सगळे पिंपल्स पण दिसत आहेत” असं म्हणाली आहे.

 

बिपाशा बासू –

करीना आणि बिपाशा या दोघींमध्ये ‘अजनबी’ या चित्रपटाच्या शूटिंग वेळी चांगलीच भांडणं जुंपली होती. पण यावेळी सुरुवात बेबोने नाही, तर बिपाशाने केली होती. बिपाशाने शूटिंगवेळी करीनाच्या कपड्यांवर निगेटिव्ह कमेंट केल्या होत्या. त्यावेळीं ती पण बिपाशाला काळी मांजर म्हणाली होती. आणि कॉफी विथ करणमध्ये जॉनला एक्सप्रेशन लेस देखील म्हणाली होती. त्यावेळी बिपाशा आणि जॉन एकमेकांना डेट करत होते. मग सैफ मुळे या दोघींमधील भांडण लवकरच थांबली. ‘रेस’ चित्रपटाच्या शूटिंग वेळी दोघीही एकत्र आल्या आणि त्यांच्यामध्ये मैत्रीही झाली.

 

तर या होत्या करीना बरोबर पंगे घेतलेल्या काही अभिनेत्री यातील कुणाची भांडण तुम्हाला जास्त मजेशीर वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *