इतर
तालुक्यातील बससेवा सुरू झाल्याने प्रवासी सुखावला

करमाळा | गेल्या काही दिवसांपासून बस सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. आणि यामुळे बससेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र सध्या संप संपल्यामुळे बससेवा पुन्हा चालु करण्यात आली आहे.
नागरिकांच्या जिव्हाळ्याची लालपरी पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. बस कर्मचारी कामावर रुजू होत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मोठे मोठे व्यवहार ठप्प झाले होते.
तसेच टपाल आणि दैनिक वाचकांना देखील मोठा फटका बसला होता. मात्र कामगार पुन्हा कामावर रुजू झाल्यामुळे बससेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.