इतर
करमाळा तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरा

करमाळा | हिंदूंचा ज्या प्रमाणे दीपावली हा प्रमुख सण असतो, त्याच प्रमाणे मुस्लिमांचा देखील एक प्रमुख सण असतो. तो म्हणजे रमजान ईद, या दिवशी मुस्लिम समाजामध्ये विविध पदार्थ करून गोडवा व्यक्त केला जातो.
हा सण करमाळा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरा केला आहे. तसेच या सणाच्या दरम्यान हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील असलेले सलोख्याचे दर्शन या रमजान ईद मुळे आज प्रत्येकाला पहायला मिळाले.
मुस्लिम समाजातील नागरिकांनी या सणाच्या निमित्ताने हिंदू धर्मातील नागरिकांना गोड जेवणाचे निमंत्रण दिले. तसेच गोड जेवण खाऊ घालून हा सण उत्साहात साजरा केला आहे. जात पात न मानता हिंदू धर्माला सोबत घेऊन हा सण साजरा करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.