इतर

करमाळा ब्रेकिंग; नारायण पाटील यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट, जिल्ह्याची सूत्रे पाटलांना मिळण्याची शक्यता?

सोलापूर | शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्याने जिल्ह्याच राजकारण तापल आहे. मोहिते पाटील यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

त्यामुळे ऐन पावसाळ्यात जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. नारायण पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून मोहिते पाटलांचे निकटवर्तीय मानले जातात. मोहिते पाटलांच्या मध्यस्थीने पाटील यांना भाजपची जिल्ह्याची सूत्रे मिळणार असल्याची देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

 

जिल्ह्याला मोहिते पाटील यांच्या नंतर भाजप मध्ये दमदार नेता नाही. त्यामुळे नारायण पाटील यांना भाजपची जिल्ह्याची सूत्रे मिळणार आहेत. गेल्या काहीच दिवसांपूर्वी पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला होता.

 

त्यानंतर देखील पाटील राज्यभर चर्चेत आले होते. सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचे काही फोटो व्हायरल होत असल्याने पूर्ण तालुक्या सोबत जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. त्यामुळे पाटील येत्या काळात काय निर्णय घेणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close