भावाच्या निधनानंतर केतकी माटेगावकरची पहिली पोस्ट आली चर्चेत

अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या भावाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. पंधरा दिवसांपूर्वी तिच्या भावाने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. भावाच्या निधनामुळे अभिनेत्री फार दुःखी आहे. मात्र आतापर्यंत केतकीने या घटनेविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे सर्व व्यक्ती तिच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होत्या.
त्यामुळे नुकतेच केतकीने आपल्या चुलत भावाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिने तिच्या भावाबरोबरचे लहानपणीचे काही व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. तसेच आपल्या भावाबद्दल एक पोस्ट लिहित तिने त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. केतकी ने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझा अक्षु, माझा छोटासा गोड अक्षु, तुझ्यासारखा अत्यंत सुस्वभावी, समंजस, मल्टी टॅलेंटेड, प्रचंड हुशार, मेहनती आणि गोड भाऊ मला मिळाला. ”
आपल्या मनातली घालमेल व्यक्त करत तिने पुढे लिहिले की, “आता काय लिहू, लिहू की नको लिहू, 21 वर्षांच्या आठवणी काही शब्दात कशा लिहू? हाच विचार करतेय. गेल्या काही दिवसांपासून माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे. ते क्षण धुसर होता कामा नये. किती आणि केवढ्या आठवणी..अक्षु तुझा समजुतदारपणा, तुझी बुद्धिमत्ता अतुलनीय होती.”
पुढे बहिणीचे कर्तव्य सांगताना ती म्हणाली की, ” तरी एक गोष्ट तुझी केतकी ताई म्हणून सांगते, आयुष्यात कुठली ही गोष्ट, ध्येय, स्वप्न, विचार आपल्या स्वत:पेक्षा मोठे नसतात. ते होऊ द्यायचे नसतात. आपण आहोत म्हणून त्यांचं अस्तित्व असतं. तू आम्हांला सोडुन गेलास पण आयुष्यभर एक गोष्ट तू आमच्या सोबत आहेस ह्याची जाणीव करुन देत राहिल.. ते म्हणजे तुझं गाणं! तुझं अप्रतिम गाणं. तुझं घरी आले की गोड हसून मिठी मारणं, कधीही तुझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि चित्रपट किंवा मॅच चालु असेल तरी तुझं प्रेमाने डोक्यावरून हात फिरवणं मिस करतेय मी.”
केतकीला असं वाटतं की, ” आसं वाटतं की आत्ता आले घरी की अमोल चाचा हार्मोनियम घेईल, तू तानपुरा लवशील आणि आपन गायला बसू. सगळं पूर्ववत… रोज सकाळी उठले की क्षणभर असं वाटून जातं आणि मग लगेच परिस्थिती मला वास्तवाचं भान करुन देते.मी हे वाक्य तुझ्यासाठी लिहेन असं वाटलं नव्हतं कधी पण.. तू जिथे कुठे असशील, अशी कल्पना करतेय की तू गात असशील, आनंदी असशील, तू कायम आमच्या मिठीत, आमच्यासोबत राहशील. आम्ही ५ कायम एकत्र असू. तू, आकांक्षा अम्मू, चाय आणि मी. माझे प्रेम कायम तुझ्यासोबत राहील. मिस यू अक्षु. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. – केतकीताई.” आपल्या भावाच्या निधनाने केतकी खूप दुःखी झाली आहे. तिच्या या पोस्ट मधून तिचे दुःख स्पष्ट दिसत आहे.