प्रेयसीच्या पायी पत्नीची हत्या; उपेंद्रने प्रीतीला अत्यंत क्रूरपणे संपवलं, वाचून धक्काच बसेल

आग्रा | गेल्या काही दिवसांपासून हत्याकांडाच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसही चक्रावून जात आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यात प्रितीची अत्यंत क्रूरपणे पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पती उपेंद्र आणि पत्नी प्रीती यांचा अवघ्या ५ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर पतीचे एका तरुणी सोबत अनैतिक संबंध होते. उपेंद्रने त्याच्या प्रेयसीला वाचन दिले होते की काही कालावधीत मी पत्नी प्रीती ला संपवून टाकेल.
एके दिवशी 21मे च्या रात्री घरात सर्व व्यक्ती झोपले होते. त्यावेळी आपल्या पत्नी सोबत उपेंद्र झोपला होता. मात्र 22 मे च्या सकाळी पत्नी प्रीती रक्ताळकेल्या अवस्थेत पडली होती. त्यामुळे नातेवाईकांनी लगेच पोलिसांना फोन करून बोलवले. पोलिस आले त्यावेळी त्या खोलीत उपेंद्र आणि दोन तरुणी होत्या.
पोलिसांनी त्या तीन आरोपींना लगेच ताब्यात घेतले, प्रेयसिला दिलेल्या वचनामुळे हे हत्याकांड करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. सदर आरोपींच्या विरोधात पोलिसांनी कोर्टात चारशिट दाखल केली आहे. सदर संशयित आरोपी सध्या तुरुंगात आहेत.