कलाकारांना झालंय तरी काय? या अभिनेत्रीला जडला कॅन्सर; डॉक्टर म्हणाले उपचारा दरम्यान

मुंबई | भारतात चित्रपटसृष्टीचा विचार केला तर साऊथ चित्रपटसृष्टी म्हणजेच दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचा बोलबाला आहे. भारताला रीप्रेझेन्ट कोण करत असेल तर ती दक्षिणात्य चित्रपटसृष्टी आहे. आता याच चित्रपटसृष्टीला कुणाची नजर लागली की काय असा सवाल उठतोय.
दक्षिणात्य अभिनेत्री हमसा नंदिनीला आजार जडला आहे. कॅन्सर हा रोग झाल्याच समजतंय. यामुळे चाहते दुःखी झालेत. वयाच्या 36 वय वर्षी हा आजार झाला असल्याचं समजतंय. तरीही त्या अभिनेत्री ही परिस्थिती सकारात्मक पद्धतीने हाताळताना दिसतायत. त्यांची केमोथेरपी चाचणी सुरू आहे. या कॅन्सरमुळे तिच्या डोक्यावरील सारे केस गेल्याच दिसतंय. अस असल तरीही एखाद्या फोटोत तरीही ती सुंदर असल्याची दिसतेय.
पेस्टल कलरच्या सुटमध्ये ती दिसतेय. एवढच नाही तर अशा परिस्थितीत फोटोशूट करणे हे धाडसाचं काम असल्यासारख आहे. जर डोक्यावर केस नसेल तर ती लाजिरवाणी बाब समजली जाते. परंतु अस असल तरीही ती बेधडकपणे डोक्यावर केस नसले तरीही तिन आपला फोटोशूट केलं आहे.
सेलिब्रिटी स्टायलिस्ट अमी पटेल यांनी या फोटोवर कमेंट करून कौतुक केलं त्या म्हणाल्या; तू सुंदर दिसतेस, तुझी कॅन्सर विरुद्ध लढाई आम्हाला दिसतेय. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तू अजून सुंदर दिसशील.
महेश मल्होत्रा यांनी देखील केलं कौतुक:
महेश मल्होत्रा हे बॉलिवूडमधील मोठ नाव आहे. या फोटोवर त्यांनी हार्ट ईमोजी शेअर केली. ग्रेसफुल, सुंदर म्हटलेय.
हमसा नेमकी आहे कोण?
हमसा ही एक दक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिन याआधी काही नाटकांमध्ये काम केलं आहे. रुद्रमादेवी या नाटकात तिन मंदाकिनीची भूमिका साकारली होती. ती आजही लोकाना ठाऊक आहे.