कृषी अपडेट

Ativrushti Nuksan Bharpai: अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर! हेक्टरी 36 हजार रुपये होणार जमा, वाचा यादी

Ativrushti Benefencery List 2022

Crop Insurance | नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून जास्त पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. तर वापसा न झाल्याने पुढील पेरणी पण करता आली नाही. म्हणून राज्य सरकार ने या शेतकऱ्यांचा विमा भरला आहे. अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 36000 रू देण्याचे घोषित केले आहे. यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील हे सविस्तर माहिती घेऊयात. (Ativrushti Nuksan Bharpai yadi – list)

 

(पीक विमा) गेल्या हंगामात झालेल्या जास्त पावसाने आणि आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी काल 23 November 2022 रोजी शासनाने वाढीव पीक विमा देण्याचा महतत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Ativrushti bharpai 2022)

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई – हंगामात झालेल्या अतिवष्टीमुळे आणि पुरामुळे अमरावती विभागांमधील पाच जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी सरकारने 157 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आम्ही या ५ जिल्ह्यांची यादी खाली दिली आहे. यात तुम्ही असाल तर तुम्हाला देखील हेक्टरी ३६ हजार रुपये मिळणार आहेत. (Pik vima list 2022)

 

    • अमरावती
    • बुलढाणा
    • यवतमाळ
    • अकोला
    • वाशिम

 

या पाच ठिकाणच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. बिगर पाण्याखाली असलेल्या शेतीसाठी 6800 एवढा प्रती हेक्टरी विमा मिळतो. तर बागायती शेतीसाठी 13500रू मिळत होता. परंतु सध्या 27000 रू जास्त प्रती हेक्टरी प्रमाणे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

 

पूर्वीचा प्रचलित 18000 रू हेक्टरी विमा मिळतो तर आता तो दुपटीने वाढला म्हणजेच 36000 प्रती हेक्टरी मिळणार आहे. तर अशा प्रकारे या पाच ठिकाणच्या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे. लवकरच 157 कोटी चे वितरण करण्यात येणार आहे व शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यांना देखील लवकर नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *