विशेष

Horoscope: आजचे राशिभविष्य, बुधवार ३० नोव्हेंबर २०२२

Daily rashi Bhavishya in Marathi: सगळया राशीचे विशेष लेख वाचा.

Today Rashi Bhavishya 30 November 2022 | मित्रांनो! जाणून घ्या आजचा दिवस कसा आहे. हे राशिफल नक्षत्रांच्या हालचालींवर अवलंबून आहे.(horoscope today) ज्यामधे सर्व राशींचा समावेश सविस्तर आहे. कुंडली काढताना ग्रह नक्षत्र याचा विचार केला जातो. तर जाणून घेऊयात आजचे राशिफल( today rashi Bhavishya)

 

मेष – या राशीच्या लोकांनी तळलेल्या पदार्थांपासून सावध राहावे, परिणामी आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. व्यापारात लाभ होताना दिसत आहे.तसेच आजूबाजूला बदल केल्यास सजावटीत भर पडेल.प्रिय व्यक्तीच्या बातम्या आपला आनंद वाढवणाऱ्या असतील. आपली प्रगती होण्याच्या मार्गावर आहे.आपला आजचा दिवस प्रवासात जाणार आहे. आज तुमचं मन शांत राहील. (astrology)

 

वृषभ – या राशीच्या लोकांनी कोण काय बोलेल यावर लक्ष देऊ नये.आज तुम्हाला तुमच्या समस्या निरसन झाल्याने आनंद होणार आहे. थोड्या प्रमाणात नुकसान होण्याची आवश्यकता नाकारता येणार नाही. तुमच्या यशामागे स्री चा हात असेल,याचे भान ठेवा. पैसा,कुटुंब या पासून दूर जाऊन आज आत्मिक आनंद शोधण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो. दिवसभर जोडीदाराच्या संगतीत असाल.(Rashibhavishya)

 

मिथुन – आज आपल्याला खास अशी आनंदाची बातमी मिळणार आहे. गर्भवती बायकांनी काळजी घ्यावी. आज तुमच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होईल. त्यामुळे अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. परंतु मित्र मंडळी मुळे तो खर्च भरून निघेल. आपण आपल्या कामात योग्य लक्ष द्या .त्यामुळे वरिष्ठ आपले खुश होतील. आज जोडीदार सोबत पूर्ण दिवस घालवला.आजचा दिवस तुम्हाला वसंत ऋतू प्रमाणे असेल.

 

कर्क – कर्क राशीच्या लोकांना आज दिवसभर कामात व्यस्त रहावे लागेल. आज पैशासाठी खूप अस्वस्थ होऊ शकतात. अनावश्यक गोष्टीवर होणारा खर्च टाळावा. अपेक्षित गोष्टी न मिळाल्याने नाराज असाल. आज तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करू शकणार आहेत. रोमँटिक क्षण आणि जोडीदाराचे सोबत राहणे यामुळे जीवनात खूप प्रमाणात बदल झालेला आहे.

 

सिंह – या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज दातदुखी त्रास देऊ शकते.लवकरात लवकर इलाज करून घ्या . आज पैसा गुंतवणुकीसाठी लक्ष द्या कारण यातून मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज विचार करून पैसे गुंतवणूक करा. अनुभवी लोकांचा आधार घेऊन गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल. प्रणय रोमाच्क असेल म्हणून आवडत्या व्यक्तीशी संपर्क साधावा. वाईट वाटणाऱ्या सहकाऱ्यांची काळजी घ्या. वायफळ गोष्टीवर वेळ घालवणे आज आपल्या साठी घातक ठरेल. आपल्या जोडीदाराशी आज वेळ द्या.

 

कन्या – आज प्रसात वेळ जाण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल.आर्थिक स्थिती सुधारेल.खास लोकांची गाठ भेट होईल. आवडत्या व्यक्तींना खुश करण्यासाठी त्यांना छोट्या वस्तू भेट म्हणून द्या.त्यामुळे जोडीदार तुमच्यावर खुश होतील. आज आपल्या महत्वाच्या योजनेवर प्रकाश टाकला जाणार आहे. आज तुमच्या इच्छेनुसार दिवस आनंदात जाणार आहे.

 

तूळ – आत्मविश्वास वाढण्यासाठी तुम्ही आपल्या आशेवर प्रकाश टाका त्याने तुम्हाला चालना मिळेल. तुमच्या मनातील भीती, नकारात्मक विचार, मत्सर या गोष्टी निघून जातील. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस चांगला असणार आहे.तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी आज उपलब्ध होणार आहेत. आपल्या आकर्षणातून नवीन मित्र निर्माण होतील. रोमान्स साठी उचलेल्या पावलाचा परिमाण दिसून येईल. ऑफिस मध्ये प्रशंसा मिळेल. जोडीदाराची आज साथ मिळेल. दिवस आजचा आनंदात जाणार आहे.

 

वृश्चिक – आज आरोग्याकडे लक्ष द्या.आपले जास्तीचे पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा. येणाऱ्या काळात या पैशाची गरज भासणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी आवडत्या व्यक्तींना गिफ्ट देऊन आनंदी ठेवा. आज महत्वाचे पाहूणे तुमच्या घरी येतील. आज आपण नवीन योजना अमलात आणू शकता. कुटुंबावर लक्ष ठेवा. त्याने तुमच्या कुटुंबातील ताणतणाव दूर होतील. वैवाहिक जीवन आनंदी करण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल.

 

धनु – भांडखोर पणा सोडून द्या. अन्यथा नात्यात कडवट निर्माण होईल.आज आपण संपत्ती कशी जमा करावी याचे कौशल्य प्राप्त कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका . नात्यातील दुरावा दूर करण्यासाठी प्रिय व्यक्तीशी संपर्क करत रहा त्याच्या सहवासात रहा. तुमचे करियर चे दरवाजे उघडण्याचे संकेत दिसत आहेत. सर्व मार्गांनी तुमचे यश दिसत आहे. इतरांपेक्षा एक पाऊल पुढे टाकण्याचे प्रयत्न करा. तुमच्या कष्टाला यश नक्कीच मिळेल. आजचा दिवस आनंदात जाईल.

 

मकर – आपली सर्वात मोठी शैली म्हणजे आपली हसण्याची कला. आपला आजार बर करण्यासाठी या कलेचा वापर करा.आहारावर दुर्लक्ष करू नका. आज पेसा अनावश्यक गोष्टीवर खर्च होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्ती सोबत वेळ घालवणे आपल्याला अती गरजेचे होईल. आपले व्यक्तमत्त्व आणि देखावा यात बदल करण्याचा प्रयत्न कर. तुमचं जोडीदार तुमच्यावर रागवण्याची शक्यता आहे. जोडीदाराला सांगण्याचे काहीही विसरू नका.आज तुमचा दिवस मध्यम स्वरूपाचा असेल.

 

कुंभ – आपला मजबूत आत्मविश्वास आपल्या कार्यात यश मिळवून देणारा आहे. आज आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आहारावर नियंत्रण ठेवा. तेलकट , आंबट पदार्थ खाऊ नका. स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायिक दृष्ट्या आज फायद्याचा दिवस आहे. त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या.आज जोडीदाराच्या इच्छा पूर्ण करा. त्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल.

 

मीन – शांती मिळवण्यासाठी निसर्गम्य परिसरात फिरायला जा. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा आहे.आपली समस्या आपल्यासाठी मोठी असू शकते पण तशी मोठी नाहीच.प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस खास असणार आहे. दिवस चांगला आहे. आज स्वतःसाठी वेळ काढा. आज फायद्याचे स्त्रोत उपलब्ध होणार आहेत. जोडीदाराच्या संपर्कात राहून दिवस घालवा. आजचा दिवस आनंदात जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close