संजयमामा भाजपमध्ये जाणार? ‘ते’ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

सोलापूर | करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे गेल्या २ दिवसापासून चांगलेच चर्चेत आले होते. त्याच कारण म्हणजे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर केलेला आरोप ठरत आहे.
गेल्या काही दिवसापासून राज्यसभा निवडणूक लागली होती, त्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळाला, यात भाजपने ३जागांवर बाजी मारली आहे. या राज्य सभेच्या निवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे चांगलेच चर्चेत आले आहेत.
कारण संजय शिंदे यांनी महा विकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान न करता, भाजपाच्या उमेदवाराला केले असल्याचा धक्कादायक आरोप खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे सदर प्रकरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.
आणि अशात संजय शिंदे यांचं एक कॉल रेकॉर्डिंग तुफान व्हायरल होत आहे. यात एक कार्यकर्ता संजय शिंदे यांना भाजप मध्ये प्रवेश करा अशी विनंती करताना दिसत आहे. त्याच्या या विनंतीला आमदार मामा म्हणत आहेत की, प्रशांत मालकांना म्हणावं तुम्ही इकडे या नाहीतर आम्ही तिकडे येतो.
दोघं सोबत मिळून काम करू, असे या व्हिडिओत ऐकायला मिळत आहे. कार्यकर्ता वारंवार त्यांना भाजपमध्ये येण्याची विनंती करत आहे. त्यानंतर मामा म्हणतात की भाजपमध्ये मोहिते पाटील आहेत. प्रशांत मालकांना म्हणावं तुम्हीच राष्ट्रवादीत या, असे संजय शिंदे म्हणाले आहेत.
त्यामुळे संजय मामा भाजप मध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. सदर रेकॉर्डिंग हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. मात्र याबाबत हा आवाज संजय शिंदेंचाच आहे, याची लोकप्रिय महाराष्ट्रने खात्री केलेली नाही.