रश्मी बागल या भाजपमध्ये जाणार? सेनेला मोठं खिंडार

करमाळा | मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविलेल्या रश्मी बागल या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याचे दिसत आहे.
बागल या राष्ट्रवादीत होत्या, त्यानंतर त्यांनी हातात शिवबंधन बांधले, मात्र त्या दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर गेल्या. मात्र आगामी काळात शिवसेना त्यांना तिकीट देईल का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे त्या भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
तालुक्यातील बागल या आघाडीच्या नेत्या आहेत. मात्र गेल्या निवडणुकीपासून त्या बॅकफुटवर गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जर सर्व पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढले तर राष्ट्रवादी कडून संजयमामा शिंदे यांना तिकीट दिले जाऊ शकते.
तसेच सेनेतून पाटील यांना तिकीट दिले जाऊ शकते. त्यामुळे बागल यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागेल, मात्र त्या जर भाजपमध्ये गेल्या तर भाजप मधून त्यांना संधी मिळू शकते. असे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. निवडणूक जवळ आल्यावर बागल निर्णय घेण्याची शक्यता आहे.