मनोरंजन

काय आहे टीआरपी, आणि ती मोजायचा कसा…. ?

पुणे | आजच्या घडीला मनोरंजन विश्व खूप मोठे झाले आहे. अनेक वेगवेगळे कार्यक्रम रोज आपण टीव्हीवर पाहत असतो. यामध्ये अनेकांची टीआरपी साठी मोठी चढाओढ होताना दिसते. पण हा टीआरपी आहे तरी काय? तो कसा मोजतात. या विषयी आज जाणून घेऊ.

 

मनोरंजन विश्वात सर्वच चॅनलची टीआरपी साठी मोठी चढाओढ होताना दिसते. आजकाल मनोरंजनात गाणी, मालिका, बातम्या यांची माहिती देणारे अनेक चॅनल आहेत. ज्या चॅनलचा टीआरपी जास्त त्याला मार्केट जास्त. टीआरपी कमी असेल तर मालिकेचे त्या चॅनलचे नुकसान होत असते.

 

त्यामुळे सर्वच जण या टी आर पी साठी मोठी चढाओढ करतात. तर टीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स. हे पॉइंट्स अगदी चॅनल पासून त्या चॅनलवर सुरू असलेल्या कार्यक्रमांना देखील मिळतात. ज्याला टीआरपी जास्त असेल त्या चॅनलवर किंवा त्या मालिकेदरम्यान जास्त जाहिराती लावल्या जातात. जास्त जाहिराती म्हणजे त्या त्या चॅनल साठी अधिकचा फायदा असतो. टीआरपी कमी असेल तर जाहिराती कमी लावल्या जातात. यामुळे त्या चॅनलला किंवा मालिकेला मुबलक पैसे मिळत नाहीत.

 

टीआरपी संख्येत मोजला जातो. तो मोजण्यासाठी एक यंत्र घरांमध्ये टिव्हीवर किंवा सेटअप बॉक्सवर बसवले जाते. आता तुमच्या पैकी बरेच जण म्हणाल आमच्याकडे तर असं कोणतंच यंत्र बसवलेलं नाही. तर जरा थांबा टीआरपी मोजण्यासाठी सर्वच ठिकाणी हे यंत्र बसवले जात नाही. काही ठराविक घरांवर किंवा केबल जवळ हे यंत्र वेगवेगळ्या ठिकाणी बसवले जाते.

 

या यंत्रातून कोणी कधी कोणता चॅनल लावला. त्या चॅनलवर त्या व्यक्तीने कोणती मालिका पहिली. किती वेळ पहिली. या दरम्यान येणाऱ्या जाहिराती त्यांनी किती वेळ पहिल्या. तसेच घरातील इतर सदस्य म्हणजे अगदी तरुण मुलांपासून ते लहान आणि वृद्ध व्यक्ती पर्यंत कोणत्या ठिकाणी कोणते चॅनल जास्त पाहिले जाते. या विषयीची माहिती मिळत असते.

 

या माहितीमुळे टिव्ही पाहत असणाऱ्या वायक्तीचे वय त्याची आवड लक्षात येते. तसेच कोण किती वेळ काय काय आणि कसे पाहत आहेत. म्हणजे एखादी जाहिरात लागल्यावर कोणी लगेचच चॅनल बदलतं आहे का? या सर्वांची माहिती त्या यंत्रामुळे समजते. त्यामुळे योग्य त्या वयोगटानुसार योग्य त्या जाहिराती दाखवल्या जातात. दुपारच्या वेळी बहुतेक महिला घरात असतात. काम झाल्यावर अनेक महिला मेजवानीचे अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी पसंती दाखवतात. तर आता टीआरपी मोजण्याच्या यांत्रवरून त्या गोष्टीवर लक्ष ठेवले जाते. त्यामुळे त्यावेळी महिलांना आवडेल अशी जाहिरात दाखवली जाते.

 

अलंकार, मालिका, कपड्यांमध्ये असलेली सुट, बाजारात नवीन आलेल्या घरकामासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वस्तू अशा अनेक जाहिराती ज्या महिलांना पाहायला आवडतील अशा स्वरूपाच्या जाहिराती प्रसारित केल्या जातात. टीआरपी रेटिंगमुळे कोणती मालिका किंवा कोणता कार्यक्रम किती पैसे कमवू शकतो याचा देखील अंदाज लावता येतो.

 

मात्र यामध्ये अनेक घोटाळे देखील होतात. काही दिवसांपूर्वी अर्णब गोस्वामी याच्या रिपब्लिक टिव्ही चॅनलने असाच घोटाळा केला होता. अनेक दिवस हे प्रकरण तापलं होतं. आता हा घोटाळा नेमका कसा होतो? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर मंडळी टीआरपीचा घोटाळा अनेक व्यक्ती अनेक चॅनल आणि मालिका करताना दिसतात. ते टीआरपी मोजण्याचे यंत्र त्यांच्या ओळखीच्या काही ठराविक घरामध्येच ठेवतात. तसेच ज्या चॅनलचा टीआरपी वाढवायचा असेल तेच तेच वारंवार पाहिले जाते. अनेकदा टीव्ही सुरू केल्यावर लगेच ते चॅनल पहिले दिसावे याची देखील सेटिंग केली जाते. त्यामुळे टीआरपीमध्ये मोठे घोटाळे देखील हातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close