मनोरंजन

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे शेवटचे क्षण गेले खूपच त्रासदायक;  वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

पुणे | आपल्या मराठी सिनेसृष्टीला पडलेले एक गोड स्वप्न म्हणजे नेमकं कोणतं असा प्रश्न विचारला तर लगेचच ओठांवर लक्षा हे नाव येतं. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी सिनेसृष्टीमध्ये दोन दशके काम केले. त्यांच्या निधनाला आता अठरा वर्षांचा काळ लोटला आहे तरी देखील चाहत्यांच्या मनामध्ये त्यांचे स्थान अजरामर आहे. आजही त्यांचे चित्रपट पाहत असताना ते आपल्यात नाहीत असे अजिबात भासत नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले.

 

त्यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या कारकीर्दीत मराठी बरोबरच हिंदी चित्रपट सृष्टी देखील गाजवली. मैने प्यार किया या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमान खान बरोबर स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर प्रत्येक वर्षी त्यांच्या आठवणींचा एक कार्यक्रम आयोजित केला जातो.

 

या कार्यक्रमांमध्ये त्यांचे अगदी प्रिय दिग्दर्शक महेश कोठारे हे आवर्जून शामिल होतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींमध्ये त्यांचे देखील डोळे पाणावतात. अशी ही बनवाबनवी हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. आजही या चित्रपटाचे क्रेझ कायम आहे. अनेक प्रेक्षक हा चित्रपट आवडीने पाहतात. यामध्ये अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांची जोडी अफलातून गाजली.

 

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महेश कोठारे या दिग्दर्शकांबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे एक अनोखे नाते होते. त्यामुळेच त्यांच्या आठवणीतल्या प्रत्येक कार्यक्रमात महेश कोठारे हमखास पाहायला मिळतात. पछाडलेला या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेसृष्टीत पहिले पाऊल ठेवले होते. पहिल्याच चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली होती. त्यानंतर आलेल्या त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षक आणि चाहते डोक्यावर घेत होते.

 

खतरनाक, धागडधिंगा, नवरा मुंबईचा, जनता जनार्दन, आपला लक्षा, झपाटलेला, एक होता विदूषक या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी दमदार अभिनय केला. 1990 मध्ये त्यांचा धडाकेबाज चित्रपट आला होता. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. या चित्रपटामुळे त्यांच्या कारकीर्दीला आणखीन एक वेगळी कलाटणी मिळाली. त्यांची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली.

 

त्यानंतर दे धमाल, एकापेक्षा एक, बाळाचे बाप ब्रह्मचारी, अशा काही चित्रपटांमध्ये ते दिसले. चिमणी पाखरं या चित्रपटामध्ये देखील त्यांनी दमदार भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये त्यांना अगदी छोटा रोल देण्यात आला होता. मात्र त्यामध्ये देखील त्यांनी स्वतःचा दमदार अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक चित्रपट आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडीने देखील मराठी सिनेसृष्टी खूप गाजवली.

 

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील या अवलियाचा 16 डिसेंबर 2004 रोजी एका दीर्घ आजाराने मृत्यू झाला. लक्ष्मीकांत बेर्डे यांना मूत्रपिंडाचा आजार होता. यामुळे शेवटच्या काळात त्यांची प्रकृती फार खालावली होती. यावेळी ते लोणावळ्याला त्यांच्या घरी गेले होते. शेवटच्या दिवसांमध्ये इथे ते एकटेच राहत होते. ते मानसिक रित्या देखील खचून गेले होते. त्यामुळे ते कुणाशीच बोलत नव्हते. याच आजारामध्ये त्यांचे निधन झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *