पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पाटील आणि बागल एकत्र येणार? शिंदेंना निवडणूक जड जाण्याची चिन्हे

करमाळा | आगामी काळात नारायण पाटील आणि रश्मी बागल एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पाटील आणि बागल युती करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
त्यामुळे ऐन पावसाळ्यात करमाळा तालुक्याचं राजकारण तापू लागलं आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर रश्मी बागल यांना पराजित व्हावं लागलं होत. तिकीट असून देखील त्यांना तिसऱ्या क्रमांकावर जावं लागलं.
यात संजय शिंदे विरुध्द नारायण पाटील असा सामना पहायला मिळाला. यात शिंदे हे काटावर निवडून आले. येत्या काळात बागल आणि पाटील एकत्र येऊन निवडणूक लढविणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या सोशल मीडियावर तशी चर्चा सुरू आहे. जर बागल आणि पाटील हे एकत्र आले तर शिंदे गटासाठी ही निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा देखील होऊ लागली आहे. त्यामुळे आगामी काळात युती होणार की स्वबळावर लढणार हे पाहण्यासारख आहे.