Shooking! प्रसिद्ध गायकावर बेछूट गोळीबार; गायकाचा जागीच मृत्यू

पंजाब | गेल्या काही दिवसापासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज जगाचा निरोप घेत आहेत. अनेकांनी अभिनय क्षेत्राला कायमचा निरोप दिला आहे. यात 2022 हे वर्ष अत्यंत धक्कादायक मानलं जात आहे.
या वर्षात अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप यात लता मंगेशकर, बप्पी लहरी या सारख्या दिग्गजांचा समावेश आहे. यांच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एका दिग्गज गायकाचे निधन झाले आहे.
त्यामुळे अभिनय आणि गायन क्षेत्राला धक्क्यावर धक्के बसले आहेत. पंजाबी प्रसिध्द गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सिद्धू हे महिंद्रा गाडीतून बाहेर जात होते.
त्यात अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यानंतर आज लगेच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
त्यांच्या हत्येमुळे अभिनय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी अज्ञांतां विरोधात गुन्हा नोंद केला आहे. सिद्धू यांच्या निधनावर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.