विशेष

Live video- 11वर्षीय बालकाचा मृत्यू,बस मागे घेताना भिंत पडली अन् होत्याचं नव्हतं झालं..

चिमुरड्यावर कोसळली संरक्षण भिंत

पालघर | पालघरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. एक लहान चिमुरड्यावर संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात मुलाला जबर जखम झाली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील बस डेपो जवळ ही घटना घडली आहे. जव्हार बस डेपोत दोन लहान मुलं होती. बस मागे घेताना संरक्षण भिंतीला धडक लागली यात दोन मुलांना इजा झाली आहे.

यात एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. मृत्यू झाल्याचं नाव ओवीस अस आहे त्याच वय 11 आहे. तर जखमी झाल्याचं असल्यानं सिंनाल हा जखमी झालं त्याचं वय हे 15 वर्षे आहे.

हे दोन्ही मुल राजकोट येथील होते. एकाच कुटुंबातील असल्याचं समजतंय. त्यांच्या पालकांनी त्यांना संरक्षण भिंती शेजारी त्यांना उभ केलं होत. अशावेळी त्यांचे पालक रिक्षा आणण्यासाठी गेले असताना इतक्यात त्यांना बसने धडक दिली. हे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसले.

 

घटनास्थळी वाहन चालक तेथून पसार झाले. सीसीटीव्हीत काही लोक बसला धक्का मारताना दिसत होते. पोलिस अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील बस ( लालपरी) ची दुरवस्था आणि परिस्थिती पुन्हा समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close