सैन्यातील मोठी नोकरी सोडून केला अभिनय क्षेत्रात प्रवेश; आज आहे बॉलिवूड मधील सर्वात प्रसिध्द अभिनेत्री

मुंबई | बॉलिवूड आणि इथली चमकदार दुनिया प्रत्येक व्यक्तीला हवीहवीशी वाटते. गावातील आणि वेगवेगळ्या शहरातील अनेक तरुण मुलं मुली हिरो आणि हिरोईन बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन मुंबईला येतात. यामध्ये अनेकांची स्वप्न पूर्ण होतात तर काहींच्या आयुष्याला वेगळीच दिशा मिळते. मात्र आपण एकदा तरी चित्रपटात दिसावं असं आपल्यापैकी अनेक लोकांना वाटतं. अशाच बॉलिवूडमधली एक सुप्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात झळकण्यासाठी चक्क सैन्यातील नोकरी सोडून आली आहे.
त्या अभिनेत्रीने देखील सुरुवातीला खूप मेहनत घेतली. जिद्द आणि चिकाटी पुढे सर्व गोष्टी मिळवणं सोपं असतं असं तिचं म्हणणं आहे. तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून माही गिल आहे.
चित्रपटात काम मिळवण्यासाठी माहीची धडपड खूप मोठी होती. काही दिवस ती सैन्यासाठी काम देखील करत होती मात्र तिच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. माहीचे वडील हे एक शासकीय अधिकारी होते.
माही लहानपणापासूनच सुदृढ आणि दमदार शरीरयष्टीची होती. त्यामुळे तिने महाविद्यालयात असताना एनसीसीमध्ये देखील सहभाग घेतला होता. यामुळे पुढे सैन्यात भरती होणं तिला आणखीन सोप झालं होतं.
माहीने सैन्य भरतीची एक परीक्षा देखील दिली होती. तसेच यात ती पास झाली होती. त्यामुळे पुढे चेन्नई येथे तिने ट्रेनिंग घेतली. यात देखील ती यशस्वी झाली. एवढं सगळ सुरळीत असून देखील तिने सैन्य का सोडलं या विषयी तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
मुलाखतीत ती म्हणाली की, ” चेन्नईमध्ये माझं ट्रेनिंग सुरू होतं तेव्हा मला तिथे एक वाईट अनुभव आला. तिथे मला फ्री कॉलिंगचा सामना करावा लागला. त्यामुळे मी खूप घाबरले होते. मी घरी देखील हा प्रकार सांगितला. तेव्हा आई बाबांनी मला तिकडून निघून येण्याचा सल्ला दिला.
त्यामुळे पुढे मी अभियन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. असं ती म्हणाली. माहीने आजवर हिंदी तसेच पंजाबी चित्रपटांत काम केलं आहे. साल २००३ मध्ये आलेला हवाये या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला. त्यानंतर खुशी मिल गई, सिर्फ पाच दिन, खोया खोया चांद, मिट्टी वजन मरदी या चित्रपटात उत्तम अभिनय केला.
चक दे पट्टे, गुलाल, पल पल दील के पास हे तिच्या अभिनयातील करिअरला कलाटणी देणारे चित्रपट ठरले. माहित नाही काही वेबसीरीज मध्ये देखील काम केलं आहे. द बार्बी इन द हिल्स ही तिची वेब सिरीज खूप चर्चेत आली होती.
माहीने जर सैन्यातील नोकरी सोडली नसती तर, आज ती एका मोठ्या अधिकारी पदावर सैन्यात सेवा देत असती. मात्र तिला आलेल्या अनुभवामुळे तिने तेथील नोकरी सोडली. त्यामुळेच सिनेसृष्टीला माही गिल सारखी हरहुन्नरी अभिनेत्री मिळाली.