माथेफिरू आईने तिन्ही मुलींचा झोपेत घेतला जीव, स्वतः पोलिसांकडे केले सरेंडर, समोर आले काळजाचा थरका पुरवणारे कारण…!

बिहार | बिहारच्या बक्सर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या तिन्ही मुलींची निर्गुणपणे हत्या करून स्वतः पोलिसांना याची कबुली दिली आहे. रागाच्या भरात महिलेने मुलींची हत्या केल्यानंतर आपली चूक असल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या ही महिला पोलीस स्टेशनमध्ये असून तिच्यावर कारवाई सुरू आहे.
गावामध्ये ही घटना कळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तसेच या महिलेने आपल्या तिन्ही मुलींना का मारले याची कुणालाच काहीच माहिती नव्हती. त्यामुळे महिलेने स्वतः याची माहिती देखील सांगितली आहे. महिलेचे हे वागणं पाहून सर्वच जण चक्रावले आहेत. पोलीस देखील थक्क झाले आहेत. सदर घटना गुरुवारी घडली. महिलेने राहत्या घरी रात्रीच्या वेळी आपल्या तिन्ही मुलींना उशीने तोंड दाबून एकेक करून मारून टाकले.
महिलेच्या तिन्ही मुलींमध्ये मोठी मुलगी 11 वर्षांची होती त्यानंतर दुसरी मुलगी 8 वर्षांची होती तर तिसरी मुलगी ही 3 वर्षांची होती. आपल्याला तिन्ही मुली झालेल्या आहेत याचा तिच्या मनात आधीपासून राग होता. अशा पोलिसांना तिने सांगितले की, ” नुकतेच आमच्या नातेवाईकांमध्ये एका महिलेने मुलाला जन्म दिला. त्यामुळे मला माझ्या मुलींचा खूप राग आला. म्हणून उशीने तोंड दाबून मी त्यांना मारून टाकले.”
महिलेने हे उत्तर देखील अगदी खडखडीत दिले. जराही न घाबरता जराही न डगमगता तिने हे उत्तर दिले. तिचा अंदाज पाहून सर्वच जण भांबवले आहेत. हा सर्व प्रकार महिलेच्या सासुबाईमुळे उघडकीस आला. सकाळी सासूने सुनेला चहासाठी आवाज दिला होता. मात्र ती बाहेर न आल्याने सासूने दार पुढे सरकवले तेव्हा तिथे तिला तिच्या तिन्ही नाती मृत अवस्थेत दिसल्या. तसेच सुनबाई घरातून फरार झाली होती.
पोलिसांकडे महिलेने येऊन सर्व माहिती सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मृत तिन्ही मुलींचे शव ताब्यात घेतले. पुढे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. तसेच महिलेवर खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या तिन्ही मुलींची हत्या केल्याने या महिलेला आता शिक्षा भोगावी लागणार आहे.