मुलीने निवडल्या क्षेत्राचा मिलिंद गवळी यांना आहे अभिमान….

पूर्वीच्या काळी अनेक पालक आपल्या मुलांना त्यांच्या करिअरसाठी क्षेत्र निवडताना आपले विचार त्यांच्यावर लादताना दिसत होते. मात्र अशात आता अनेक पालक याला अपवाद ठरतात. त्यातीलच एक अभिनेते मिलिंद गवळी.
अभिनेते मिलिंद गवळी यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. अनिरुद्ध ही भूमिका विरोधी आहे. मात्र तरी देखील त्यांच्या अभिनयाचे अनेक जण कौतुक करतात. त्यांचा अभिनय नेहमीच कौतुकास्पद राहिला आहे.
मिलिंद यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव मिथिला आहे. तिचे लग्न झाले असून ती तिच्या पती बरोबर सुखी आयुष्य जगते. तसेच मिथिला ही एक फिटनेस ट्रेनर आहे. शिवाय तिला नृत्याची देखील आवड आहे. त्यामुळे तिने नृत्य देखील शिकले आहे. तसेच आता ती नृत्याचे देखील क्लास घेते. मिलिंद गवळी त्यांच्या लेकीवर खूप प्रेम करतात. अशात आता त्यांनी आपल्या मुलीबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मुलीचे कौतुक केले आहे.
त्यांनी यामध्ये लिहिलं आहे की, ” होय मी एक अभिमानी पिता आहे. माझ्या मुलीला मी विचारले तुला कोणता व्यवसाय निवडायचा त्यावर ती म्हणाली की, “फिटनेस ट्रेनर” आणि तिच्या या निर्णयाचा मला अभिमान वाटतो. जेव्हा मिथिला माय डॉटरने हा व्यवसाय स्वीकारला तेव्हा मला खरोखरच आश्चर्य वाटले. रोज सकाळी जेव्हा मी तिची प्रगती पाहतो, जेव्हा मी तिची उत्साही, समर्पित आणि मेहनती पाहतो, मला अभिमान वाटतो, मला बाहेरून प्रेरणा शोधावी लागत नाही, ती माझ्या घरातच आहे, दोन पिढ्यांकडून प्रेरणा मिळाल्याबद्दल मी किती भाग्यवान आहे.”
पुढे ते म्हणाले की, ” एक माझी भूतकाळातील पिढी म्हणजे माझे पालक, माझे वडील श्रीराम गवळी अजूनही माझ्यापेक्षा जास्त मेहनत करतात आणि माझी पुढची पिढी म्हणजे माझी मुले. हे स्वयंप्रेरित लोक आहेत आणि मला ते खूप आवडतात.
माझ्या मुलांनो तुम्हाला खूप प्रेम आणि आशीर्वाद.” असं त्यांनी लिहिलं आहे.