मोबाईलने घेतला ८ वर्षीय चिमुकलीचा जीव, वाचून डोळ्यात पाणी येईल

आपण बरेच वेळा मोबाईल स्फोट झालेल्या बातम्या वाचल्या असतील. बरेचवेळा या मोबाईल स्फोटामुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागला. आपण जर मोबाईलचा जास्त वापर करत असाल तर आपल्यालाही काळजी घेणं गरजेचं आहे. केरळ मधील एका आठ वर्षाच्या मुलीचा मोबाईल स्फोटामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आठ वर्षाची चिमुरडी मोबाईल चालवत असताना ही दुर्देवी घटना घडली. आपल्या चेहऱ्यावर समोर मोबाईल घेऊन आदित्यश्री नावाची मुलगी चालवत होती. त्याच वेळी मोबाईलचा स्फोट झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच लगेच पोलीस घटना स्थळी पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार आदित्यश्री ही तिसरी मद्ये शिकत होती. रात्रीच्या 10.30 वाजता मोबाईल चालवत असताना स्फोट झाल्याचे सांगितले. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशोक कुमार हे माझी ब्लॉक पंचायत सदस्य यांची मुलगी आहे. या चिमुरडी ने मोबाईलवर बराच वेळ व्हिडिओ पाहिले. व्हिडिओ पहिल्याने मोबाईल ची बॅटरी जास्त गरम झाली. त्यामुळे मोबाईल चा स्फोट झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. स्फोट झाल्यानंतर काही तासातच आदित्यश्री चा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी स्फोट झाला तेथे फॉर्सनेक टीम तपासणीसाठी सुध्दा आली. या टीम ने तेथील स्फोटाचे वेगवेगळे नमुने गोळा केले.
मोबाईल च स्फोट घटना धक्कादायक आणि भीतीदायक असल्यामुळे पोलिसांना सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी पोलिसांना टीम बोलवावी लागली. फॉर्सनिक टीम ने सर्व पुरावे गेला केले आहेत आणि या घटनेचा पूर्ण तपास करत आहेत. तसेच तज्ञ लोक ही या घटनेचा तपास करत आहेत.
हा मोबाईल सुमारे तीन वर्षापूर्वी खरेदी केला होता. आदित्यीश्री च्या वडिलांनी हा फोन त्यांच्या भावाकडून घेतला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी या मोबाईल ची बॅटरी बदलली होती. ज्यावेळी मोबाईल चा स्फोट झाला तेव्हा घरामध्ये अदितीश्री आणि तिची आजी होत्या. आजी या घरामध्ये जेवण बनवत होत्या तेव्हा हा स्फोट झाला. स्फोटात चिमुरडीचा चेहरा पूर्ण जाळला गेला तर हाताची बोटे देखील तुटली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अदितीश्री च्या मृत्यू मुळे हळहळ केली जात आहे. या घटनेचा तपास पोलीस टीम आणि फॉर्सेनिक टीम करत आहे.