विशेष

Monthly Horoscope : या महिन्याचे राशीभविष्य – December 2022

Monthly rashi Bhavishya in Marathi - सगळ्या राशींचे विशेष लेख वाचा

Today Rashi Bhavishya  December 2022

Monthly Horoscope | नमस्कार मित्रांनो,मासिक राशभविष्य म्हणजेच राशीच्या आधारे पूर्ण महिन्याचे केलेले भविष्य होय. या भविष्यावनीला लोक monthly horoscope असेही म्हणतात. मासिक राशिभविष्य एका व्यक्तीला त्याच्या राशीच्या मदतीने पुढील 30 दिवसात ज्या काही गोष्टी घडतात याबाबत माहिती दिली जाते.(astrology)

या भविष्य वाणीला फलादेश असे म्हणतात. या वरून त्या व्यातीचे चांगले दिवस किंवा वाईट दिवस असे ठरवले जाते. याबाबत आपण सविस्तर माहिती पुढे घेणारच आहोत.आपले भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्याला आपली रास माहित असणे गरजेचे आहे. चला तर मग आपण पाहुयात मासिक राशी भविष्य.(Monthly horoscope today)

December horoscope –

मेष 
मेष राशीच्या कोणासाठी डिसेंबर महिना चढ उतार याने भरलेला असेल.तुमच्या जीवनातील काही महत्वपूर्ण बदल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतले जाऊ शकतात. ग्रह एकदम चाल बदलतील.शनी महाराज त्याच्या स्थानावर विराजमान होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला कामात आनंद वाटेल . तुम्ही काम करत असल्या ठिकाणी नाव लवकिक कराल. बुध आणि शुक्र याच्या नवमं भागात येणाऱ्या भग्याला बळ मिळेल. सुर्य तुमच्या नवमं भावात आल्याने नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. शुक्राचे नवमं भावात जाण्याने 5 डिसेंबर पासून व्यापारात मोठे बदल झालेला दिसून येईल. बृहस्पति देवाच्या आशीर्वादाने तुम्ही शिक्षण घ्याल. तुमचं लांबवर प्रवास होईल.व्यापारामध्ये प्रगती होईल. मंगळ तुम्हाला मदत करेल पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावा लागणार आहे.
बाहेर देशात जाण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल.तसेच विद्यार्थांसाठी उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याची संधी मिळेल

येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उपाय
मंगळवारी हनुमान चालीसा वाचा.
बुधवारी वाटी भरून काळे तीळ मंदिरात दान करा

वृषभ
या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर  महिना मिश्रित स्वरूपाचा असेल. करियर साठी डिसेंबर महिना उत्तम राहील. आपल्या व्यवहारात खाजगी रीतीने लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही जर नोकरी करत असल तर तिथे नीट वागा .जास्त रागीट पण तुम्हाला त्रासदायक ठरेल. व्यापार करत असाल तर हा महिना चांगला आहे . तुम्हाला व्यापारात यश मिळेल. व्यापारातील भागीदार हा थोडा रागीट असेलतर त्याचाशी नम्रतेने बोला. कोणतीही गोष्ट वाढू देऊ नका.त्यामधे तुमचंच नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे अभ्यासात मन लागेल. विद्यार्थ्यांना महिना चांगला आहे.जर कोटुंबिक बाबतीत विचार करत असाल तर दुसऱ्या भावाचा स्वामी बुध हा सप्तम स्थानात असेल.त्यामुळे सगळ्या अडचणी सहज सुटतील  पहिल्या आठवड्यात काही समस्या निर्माण होतील पण त्याही लगेच सुटतील .यावेळी आर्थिक अडचणी येऊ शकतात.जर प्रेम विषयी पाहत असल तर पंचम भावाचा स्वामी बुध सप्तम भावात विराजमान आहे. त्यासोबत शुक्र ही सोबत आलेला आहे. याचा हाच इशारा आहे की प्रेम विवाह होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या काळात प्रेमविवाह होण्याची दाट शक्यता आहे.

येणाऱ्या अडचणी वर सामना करण्यासाठी उपाय

शुक्रवारी लहान कण्यांचा आशीर्वाद घेत रहा.
शुक्रवारी स्पटिकच्या माळेने माता लक्षी चे मंत्र पठण करा.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना चढ उतार ने भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीला थोड्याशा अडचणी येतील .परंतु नंतर स्थिती हळूहळू सुधारेल.तरीही तुम्हाला सुरुवात व्यवस्थित करावी लागेल. करिअरच्या दृष्टीने महिना अती उत्तम राहील. काही गोष्टी नियंत्रण बाहेर जातील .थोडा वेळ जाऊन द्यावा तुमच्यासाठी चांगले राहील.

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना खास असेल. थोडीशी आरोग्याची काळजी घ्या.खाण्यावर नियंत्रण ठेवा. महिना चढ उतराने भरलेला असेल.आपण निष्काळजी पणाने राहू नका. प्रेम जीवनात थोड्याफार अडचणी येऊ शकतात. कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. निद्रानाश ची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत जागरूक रहा.

कन्या
हा महिना अतिशय खास असणार आहे.  कोणत्याही अफवा वर विश्वास ठेऊ नका. तुम्ही शांत असाल तर अधिक फायदा होईल. थोड्याफार प्रमाणात तणाव येण्याची शक्यता आहे. शिवाय या महिन्यात आनंद व सुख लभण्याची शक्यता आहे. या महिन्यात प्रवास होण्याची
शक्यता आहे. आरोग्य बाबत थोडीशी काळजी घ्या.

मकर
या राशीच्या लोकांनी सावध रहा .इतर लोक तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ अधिकऱ्यांकडून पिळवणूक होईल. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबात आनंदी वातावरण असेल.आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.काळजी घ्या.

धनु
डिसेंबर महिना तुमच्यासाठी खास असेल.  या राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावे. कुटुंबात खास व्यक्तीचे आगमन होईल.रागावर नियत्रन ठेवल्याने तुमचं नुकसान होण्यापासून वाचेल. शक्यतो या महिन्यात प्रवास करणे टाळावे. हा महिना आनंदात जाईल.

सिंह
हा महिना चढ उतरणे भरेला असेल.कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल.घरातील व्यक्तींना मान सन्मान द्या.या महिन्यात प्रवास होण्याचा संभव आहे. शक्यतो रागावर नियंत्रण ठेवावे.त्यामुळे तुमचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. तुम्हाला आपल्या घरातील व्यक्तीसोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे . आर्थिक दृष्ट्या हा महिना चांगला असेल .थंडीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.आरोग्याची काळजी घ्या.

तूळ
तुमच्या साठी डिसेंबर महिना आनंदाचा असेल.बाहेर जाण्याचे योग असेल. निसर्गाने तुम्हाला आत्मविश्वास व बुद्धिमत्तेचे दान दिले आहे. येणाऱ्या काळात समस्या येऊ शकतात. घरात सुख समृध्दी नांदेल महिना चांगला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close