मराठी कलासृष्टीवर शोककळा! पद्मभूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध लावणी सम्राज्ञीच निधन
Mourning the Marathi arts! The famous Lavani empress who received Padma Bhushan passed away

मुंबई : वर्ष २०२२ हे कला क्षेत्राला शोककळा लावणारे गेले आहे.एकापाठोपाठ दिग्गच कलाकार या वर्षी गेल्याचे दिसून येत आहे. अभिनेता विक्रम गोखले निधनाने संपूर्ण जग शोकात असतानाच आज नवीन दुःखद बातमी आल्याचे समोर आले आहे.
अनेक चित्रपट मधून आपल्या मंजुळ आवाजाने ऐकणाऱ्या वेड लावणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं निधन झाल्याचे वृत्त समोर अल आहे. विजय चव्हाण हा सुलेचणा यांचा मुलगा याने ही या बातमीला सहमती दर्शवली आहे. त्यांची तब्येत खराब झाली होती.त्या आजारी होत्या असा त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी सांगितले.
अखेरचा श्वास घेते वेळी सुलोचना या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांचं निधन हे ते राहत असलेल्या मुंबईतील फणासवडी या गावी झाला. सुलेचना चव्हाण यांना गेल्या काही महिन्यांपूर्वी भारत सरकारने कला क्षेत्राला अमूल्य देणगी दिल्या बद्दल पद्मभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
१३ मार्च १९३३ रोजी सुलोचना चव्हाण यांचा जन्म झाला होता. त्यांनी अनेक प्रसिद्ध लावण्याचे गायन केले होते. पाडाला पिकलाय आंबा, मला म्हणत्यात पुण्याची मैना, फड सांभाळ ग यांसारख्या अनेक महत्वाच्या ठसके बाज लावण्या त्यांनी आपल्या मंजुळ स्वरात गायल्या आहेत.
सुलोचना चव्हाण यांनी ९ व्या वर्षी पासून लावणी गायला सुरुवात केली होती. २०१०साली त्यांना लता मंगेशकर तर २०१२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. चव्हाण यांनी रंगल्या राती या चित्रपटातही सर्वात पहिली लावणी गायली होती.
सुलोचना चव्हाण यांच्या प्रसिद्ध लावण्या तुझ्या उसाला लागलं कोल्हा, सोळावं वरीस धोक्याच, पद्रावरती जरतरीचा, कसं काय पाटील बरं हाय का. या सारख्या अनेक आहेत. सुलोचना चव्हाण यांनी अनेक हिंदी फिल्मसाठी देखील गाणी रेकॉर्ड केली होती. छोटी चोरी आग सी दिलं मे लगा के , उल्फत जीसे कहते है, जिने का सहारा है ,मोसम आया है अशी अनेक हिंदी गाणी आहेत.
सुलोचना चव्हाण यांनी ७० चित्रपटांपेक्षा जास्त चित्रपटात गाणी गायली आहेत. अशा या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं निधन झाल्याने संपूर्ण कला क्षेत्राला शोककळा लागली आहे. अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली.तर अनेकामधून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.