विशेष

निःशब्द! मायलेकीची आत्महत्या, दुसऱ्या लग्नाच्या चौथ्या दिवशी घेतला जगाचा निरोप

Mute! Mileki committed suicide on the fourth day of her second marriage

कर्नाटक : प्रत्येक पालक हे आपल्या मुलांसाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. परंतु काही वेळेस अशा काही गोष्टी घडून जातात की त्याचा विचार करणेही आपल्याला अवघड जाते. अशा घटनेने शेवटचे पाऊल उचलावे देखील लागते. आपली मुलं आपल्या शिवाय या जगात आनंदान राहू शकणार नाहीत अशी आईची समज असते. या विचारानेच टोकाचे पाऊल उचलावे लागते.

 

स्थानिकांच्या मिळालेल्या माहितीनुसार हसन हे कर्नाटकातील गाव .यातील एका महिलेने आपल्या चिमुकल्या मुलीसह आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या पहिल्या पतीला विसरणे शक्य नाही हेच या मागचे कारण होते. प्रज्जवला नावाच्या महिलेचे राजेंद्र नावाच्या व्यक्तीशी प्रेमविवाह झाला होता.

 

त्यांना एक मुलगी सुध्दा झाली होती. परंतु एके दिवशी अपघातामध्ये राजेंद्र ही मरण पावले. याच्यामुळे प्रज्ज्वला खूप दुःखी झाली होती.ती आपल्या छोट्या मुलीच्या भविष्याचा विचार करत असत. एके दिवशी मोहन याने प्राज्जवला लग्नाची मागणी घातली. तिने ती मान्य केली.

प्रज्जवलाच्या वडिलांनी सुध्दा त्यांच्या भविष्यासाठी लग्नाला मान्यता दिली होती. मोहन आणि प्रज्जवला चे लग्न झाले. परंतु प्रज्जवलाला तिच्या अगोदरच्या पतीची आठवण येत होती. ती राजेंद्र वर खूप प्रेम करत होती. आणि ती ते प्रेम विसरू नव्हती. तिला मुलीच्या भविष्याची चिंता होती त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले आणि आपल्या छोट्या मुलाबरोबर आपले आयुष संपवले.

 

जेव्हा मोहन कामावरून घरी आला तेव्हा त्याला धक्का बसला. त्याने प्रज्ज्वलाच्या घरच्यांना माहिती दिली. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली होती.या घटने बाबत पोलिसांकडे माहिती दिली. त्यांनी घटनेचा तपास चालू केला.या घटनेमुळे इवल्याशा बाळाला सोबत घेऊन गेल्यामुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांना संशय आल्यामुळे घटनेचा कसून तपासणी केली जाते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close