निःशब्द! ‘बाबा मला माफ करा’ म्हणाली आणि नवविवाहित तरुणीने घेतला टोकाचा निर्णय; वाचून डोळयात पाणी येईल

मुंबई : खालच्या जातीतील असल्यामुळे सासू साऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मुंबई मधील चेंबूर येथे एका नवविवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून त्या तरुणीच्या पती विरोधात तसेच सासू सासरे यांच्या विरोधात देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव युक्ता आहे.
सासरकडिल लोकांनी त्रास दिल्यामुळे युक्तीने आत्महत्या केली आहे अशी तक्रार युक्ताच्या वडिलांनी पोलिसात दिली. या तक्रारीनुसार युक्तच्या पती ,नणंद,सासू सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. युक्तां आणि हर्शल यांचा प्रेम विवाह झाला होता. युकता ज्या ठिकाणी राहत होती त्याच इमारती मध्ये हर्शल राहत होता त्यामुळे दोघात प्रेम संबंध होते.
परंतु हर्शल आणि युक्ता यांच्या लग्नासाठी हर्शलच्या घरचे तयार नव्हते. त्यामुळे हर्शल आणि यूक्ता यांनी पळून जाऊन लग्न केले. त्यांच्या घरच्यांना समजल्यानंतर हर्शल आणि त्याची पत्नी युक्ता हे दोघेही चेंबूर येथे रूम भाड्याने घेऊन रहायला लागले. थोडया थोडया कारणावरून या दोघात सारखी भांडणे होत असत. जुलै महिन्यात या दोघात जोराचे भांडण झाले होते. या भांडणाच्या वेळेस हर्शल ने त्याच्या बायकोला मारहाण देखील केली होती. त्यांनतर थोड्याच दिवसात युक्ता ते दोघे जण राहत असलेल्या रूम मध्ये फाशी घेतलेली आढलून आली.
सासरकडच्या लोकांनी त्रास दिला, त्यामुळे सासरच्या छळाला आणि त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप युकताच्या वडिलांनी केला. त्या संबंधी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देखील केली आहे. याचा तपास चेंबूर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.